MVPS Nashik 7th Pay Commission | मविप्र कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षे सेवा झालेल्या सेवकांना लागू होणार सातवा वेतन आयोग!

MVPS Nashik 7th Pay Commission | सरचिटणीस अॅड. ठाकरे : वार्षिक सर्वसाधारण सभेत 1,229 कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी
MVPS Nashik 7th Pay Commission
MVPS Nashik 7th Pay Commission
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा विद्या प्रसारक समाजात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवेत असलेल्या सेवकांना १ जानेवारी २०१७ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल. तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांचाही योग्य मोबदला देण्याचे आश्वासन 'मविप्र'चे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी दिले. 'मविप्र' समाजाची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा हायस्कूलच्या रावसाहेब थोरात सभागृहात झाली. यावेळी विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी तसेच शाब्दिक चकमकी झाल्या.

MVPS Nashik 7th Pay Commission
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यातून घडणार 'नवे नाशिक'; पुढील 40 वर्षांचा आराखडा तयार!

सभेत सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी संस्थेच्या १ हजार २२९ कोटी ३० लाख रुपयांच्या विक्रमी अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी 'मविप्र'चे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. त्यानंतर दिवंगत सभासद आणि सेविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दुखवटा प्रस्ताव मांडला.

यानंतर दिव्यांगता श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजाध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी सभासदांचे स्वागत केले, तर सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. सभेत मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, नवीन सभासदांना २०२५-२०२६ चा वार्षिक अहवाल मंजूर करणे,

२०२५-२०२६ मधील मध्यवर्ती कार्यालय तसेच सर्व शाखांचे विभागवार एकत्रित खर्च-उत्पन्न पत्रके आणि ताळेबंद पत्रकास मंजुरी देणे, २०२६-२०२७ साठी मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांच्या एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन २०२६-२०२७ साठी हिशोब तपासणीसांची नियुक्ती करणे, संस्थेच्या दैनंदिन कामकाजातील अडचणींचा विचार करणे, संस्थेच्या विकासासाठी आर्थिक बाबींचा विचार करणे आणि भविष्यातील उद्देशपूर्तीनुसार पुढील कार्याची दिशा निश्चित करणे, या विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

संस्थेच्या मालकीच्या स. नं. ६९० 'अ' व 'ब' मधील फायर ब्रिगेड स्टेशनसाठी आरक्षित असलेले ८ हजार चौरस मीटर क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात पंधरा दिवसांत निर्णय घेण्याचा विषय सभेने प्राधिकृत करण्यात आला. या विषयावर कायदेशीर सल्ला तसेच तज्ज्ञांचे मत घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी स्पष्ट केले.

विविध विषयांचे वाचन 'मविप्र'चे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. प्रसाद सोनावणे, अॅड. संदीप गुळवे, अॅड. लक्ष्मण लांडगे, अॅड. रमेशचंद्र भोसले, रमेश पिंगळे आणि अॅड. संभाजीराव गायकवाड यांनी केले. शिक्षणाधिकारी डॉ. डी. जाधव यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.

सभेदरम्यान संस्थेच्या विविध प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधक गटांमध्ये जोरदार चर्चा झाली. काही मुद्द्यांवर दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण तापले होते. त्यावेळी संस्थेच्या सेवकांच्या वेतनाविषयी मुद्दा समोर आला. दहा वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत अॅड. नितीन ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.
प्रलंबित कर्मचाऱ्यांच्या वेतनाविषयीबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सभेस मविप्रचे संचालक शिवाजी गांगुर्डे, रवींद्र देवरे, कृष्णाजी भगत, प्रविण जाधव, नंदकुमार बनकर, विजय पवार, डॉ. प्रसाद सोनावणे, अमित भोसले, महिला सदस्य शोभा बोरस्ते, शालन सोनावणे, सेवक सदस्य प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, जन्नाथ निंबाळकर यांच्यासह माजी सरचिटणीस नीलिमा पवार, माजी अध्यक्ष तुषार शेवाळे, अरविंद कांदे आदी उपस्थित होते. जिल्हाभरातून हजारो सभासद व हितचिंतक सभेला उपस्थित होते.

सभास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त

'मविप्र'मध्ये मागच्या सर्व जागरणा सभेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी स्टेजवर चक्क रिव्हॉल्व्हर ठेवलेला असलेला व्यक्तीही व्यासपीठावर दिसून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी कायदा सुव्यवस्थेचा अबाधित राहावी म्हणून पोलिस बंदोबस्त मोठा बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की, पोलिस निरीक्षक कैलास राजपूत, विजय तरवारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह ४० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता.

प्रवीण जाधव व प्रवण पवार यांच्यात शाब्दिक चकमक

सर्वसाधारण सभेतील विषयांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रवण पवार हे बोलण्यासाठी उभे राहिले, त्यावेळी त्यांनी विद्यमान कार्यकारिणीवर काही आरोप केले, त्यादरम्यानचे संचालक प्रवीण जाधव हे बोलण्यासाठी वर येऊन प्रवण पवार यांना म्हणाले की, 'तुम्ही खाली बसा' यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

रस्त्याच्या प्रश्नावर ढिकले यांचे स्पष्टीकरण

दुलाजी नाना कृषी महाविद्यालयाच्या रस्त्याबाबत डॉ. सुनील ढिकले यांनी सांगितले की, जागेबाबत सांगली चर्चा करून कुटुंबीयांना दोन नोटीसचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने नंतरच्या कार्यकारिणीने रस्त्याचा प्रश्न सोडवला. दोन्ही कार्यकारिणीत काम केल्याने दोन्ही बाजू मला माहीत आहे.

तुम्ही पण माजी सरचिटणीस होणार आहात

सभेदरम्यान माजी सरचिटणीस नीलिमा पवार बोलण्यासाठी उभ्या राहिल्या असता, त्यांचा माईक बंद करण्यात आला. त्यावर, नीलिमा पवार बोलत राहिल्या मात्र, त्यांचा आवाज येईना त्यावेळी सभेत आवाज... आवाज... अशी ओरड झाली. अध्यक्ष सुनील ढिकले यांनी वारंवार अध्यक्ष ढिकले यांनी चालू करण्यास सांगता आला नाही. यानंतर अध्यक्ष ढिकले यांनी सरचिटणीस ठाकरे यांच्यावर खुली नाराजी व्यक्त करत तुम्हीदेखील एक दिवस माजी सरचिटणीस होणार आहात हे लक्षात ठेवा, असे सुनावले.

अखेर 'मविप्र विद्यापीठ' नामंजूर करण्यात आले. 'मविप्र विद्यापीठा'च्या मुद्द्यावर पुन्हा एकदा घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, अध्यक्ष सुनील ढिकले व अॅड. नितीन ठाकरे यांनी सदर 'मविप्र विद्यापीठ' हा विषय आता बंद ठेवला आहे, असे सांगितले. 'मविप्र संस्था' या शब्दाऐवजी 'मविप्र नामंजूर' असा शब्द वापरावा. यावर सर्व कार्यकारिणी एकमत दिसून आल्याने घोषणाबाजी थांबली. ६० लाख रुपयांचा भुर्दंड दुलाजी नाना कृषी महाविद्यालयाच्या रस्ता मार्गातील कार्यकारिणीच्या चुकीमुळे साडे सात दिवसांची नवीन जागा घेऊन रस्ता दावा लागला.

MVPS Nashik 7th Pay Commission
Nashik Simhastha Kumbh Mela | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी आखाड्यांमध्ये दुफळी; शैव साधूंचे दोन गट आमनेसामने

हा भुर्दंड संस्थेला बसला आहे, असे ठाकरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. त्यावेळी अॅड. सुनील ढिकले यांनी कृषी महाविद्यालयासाठी त्यांना संस्थेमध्ये दोन नोकऱ्या देण्याचे कुटुंबीयांना आश्वासनेही देण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यामध्ये नंतरच्या कार्यकारिणीमध्ये सदर रस्त्याचा प्रश्न सोडवण्यात आला. मी दोन्हीही कार्यकारिणीत काम केलेले असल्याने मला या दोन्ही घटना माहीत आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दोन एकर जागेबाबत सामूहिक निर्णय

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेला उद्योग बोर्डींग येथील मविप्र संस्थेची दोन एकर जागा फायर ब्रिगेड स्टेशनसाठी आवश्यक आहे. यासंदर्भात महापालिकेने संस्थेला पत्रव्यवहार केला आहे. सदर जागा फायर ब्रिगेडसाठी आरक्षित करण्याबाबत ५९२.३ चा ठराव असण्याची माहिती अॅड. अध्यक्ष सुनील ढिकले यांनी दिली.

मात्र, जागा देण्यासंदर्भातील अंतिम निर्णय संस्थेची एकत्रित कार्यकारिणी व संचालक मंडळ यांच्या बैठकीत सामूहिकरीत्या घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 'माझा माईक बंद होता कामा नये' अॅड. नितीन ठाकरे यांचे प्रास्ताविक संपल्यानंतर अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले उभे राहिले. मिश्किलपणे ते म्हणाले, "मी आता या सभेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे माझा माईक बंद होता कामा नये. मी सांगतो तोपर्यंत कोणीही माईक बंद करू नये," असे सांगताच सभागृहात हशा पिकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news