

नाशिक : जिल्ह्यात नगरपरिषदांच्या सात प्रभागांच्या निवडणुका स्थगित झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने २२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात बुधवारी झालेल्या माघारीत सिन्नर मधील एक प्रभागात माघार झाली आहे.
माघारीच्या अखेरचा दिवशी सिन्नर नगरपरिषदेतील फक्त एका प्रभागातून माघार झाल्याने एक प्रभाग बिनविरोध ठरला आहे. आता सिन्नरचे ३, ओझरचे २ आणि चांदवडचा १ अशा मिळून ६ प्रभागांसाठी निवडणुका होणार आहेत. निवडणूक २० डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून, निकाल २१ डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने या प्रभागांसाठी पुन्हा तयारी सुरू करावी लागणार आहे.
राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना नाशिक जिल्ह्यात काही प्रभागांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली होती. त्यात सिन्नर नगरपरिषदेचे चार, ओझरचे दोन आणि चांदवडचे एक प्रभागांचा समावेश होता. निवडणुका पुढे ढकलल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती आता निवडणुकांसाठी तब्बल २२ उमेदवार रिंगणात आहे.
या प्रभागात होणार मतदान
सिन्नर : प्रभाग 2 अ (मागासवर्गीय महिला), 4 अ (अनुसूचित जाती महिला), 10 ब (सर्वसाधारण)
ओझर : प्रभाग 1 अ (अनुसूचित जाती), 8 ब (सर्वसाधारण)
चांदवड : प्रभाग 3अ (मागासवर्ग)