Municipal Election 2025 : प्रचाराचा धुराळा शमला

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रचार सभांची नाशिकमधून सांगता
नाशिक
नाशिक : जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत आठवडाभरापासून आरोप-प्रत्यारोपांचा सुरू असलेला धुराळा सोमवारी (दि. 1) शमला. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत आठवडाभरापासून आरोप-प्रत्यारोपांचा सुरू असलेला धुराळा सोमवारी (दि. 1) शमला. या नगरपरिषदांच्या निवडणुका प्रामुख्याने महायुतीने यातही भाजप व शिंदे शिनसेनेने प्रतिष्ठेच्या केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या मैदानात उतरले होते.

दोघांनाही आठवडभरात दोनदा जिल्हा दौरे करत, तीन- तीन सभा घेत मतदारांना साद घातली. इतकेच नव्हे तर, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवडाभराच्या प्रचाराची सांगता ही सोमवारी नाशिकमध्ये केली. तर, उपमुपख्यमंत्री शिंदे यांनी देखील त्र्यंबकेश्वर येथे सभा घेतली. प्रचारात महायुतीचा बोलबोला दिसला असला तरी, महाविकास आघाडीनेही स्थानिक नेत्यांच्या जोरावर सभा घेत विरोधक असल्याचे दाखवून दिले.

नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतील भाजप व शिंदे शिवसेना यांच्यात रूसवा फुगवा झाले. ही रूसवे फुगवे अगदी दिल्ली दरबारी देखील पोहचले होते. यानंतर, महायुती एकसंघ होईल ही अपेक्षा फोल ठरत 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुती जिल्ह्यात दुभगंली गेली. तर, महाविकास आघाडीतही बिघाडी झाली. नगरपरिषदांमध्ये भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांसमोर ठाकली गेली. त्यामुळे या तिघाही पक्षाने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळा होत असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे पहिली सभा घेतली. त्याचदिवशी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सटाणा, नांदगाव, मनमाड नगरपरिषदांसाठी सभा घेत, प्रचाराची राळ उठवली.

दुसऱ्या टप्यातही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी येवला, भगूर व सिन्नर येथे सभा घेऊन विकासाचे साकडे घातले. भाजपासाठी जिल्हयात ठाण मांडून असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी अर्धाडझनहून अधिक सभा घेतल्या. तसेच रॅली काढल्या. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील सटाणा येथे सभा घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर येथे तर, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत सभा घेतल्या. मंत्री छगन भुजबळ हे रूग्णालयात असताना देखील त्यांनी येवला नगरपरिषदेची निवडणुक ही प्रतिष्ठेची केली. त्यासाठी मंत्री भुजबळ यांनी थेट रूग्णालयातून ऑनलाइन सभा घेत येवलेकरांना भावनिक आवाहन केले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष उबाठा शिवसेना, काॅंग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांना सभा घेतल्या. यात नितीन बानगुडे पाटील, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, खासदार शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल कदम, प्रदेश पदाधिकारी राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांनी सभा घेतल्या.

Nashik Latest News

तिघांचेही लक्ष्य नाशिक

राज्यात नगरपरिषदांच्या निवडणुका असल्या तरी, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी नाशिकला लक्ष्य केल्याचे दिसून आले. सभेचा अखेरच्या दिवशी म्हणजे सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांनी नाशिक जिल्हयावर लक्ष केंद्रीत केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिन्नर व पिंपळगाव बसवंत येथे सभा घेत, आपल्या प्रचाराची सांगता केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्र्यंबकेश्वरला सभा घेतली. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगूर, ओझर व पिंपळगाव बसवंत येथे सभा घेत प्रचाराची सांगता केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news