Municipal Council Elections : नगरपरिषद निवडणूकीत पहिला दिवस निरंक

11 नगर परिषदांमध्ये पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही
Municipal council Election
Municipal Councils-Municipal Panchayats Election Pudhari Photo
Published on
Updated on

नाशिक: जिल्हयातील ११ नगरपरिषदांसाठी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून (दि.10) सुरूवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेचे सहआयुक्त शाम गोसावी यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि.10) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली. येवला, ओझर, पिंपळगाव बसवंत, बागलाण, चांदवड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मनमाड, सिन्नर, भगूर, नांदगाव या ११ नगर परिषदांमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नगरपरिेषदांचे कर्मचारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी बसून होते. परंतु एकाही ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे नगरविकास शाखेला कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news