Nashik Municipal Corporation Election | नाशिकच्या पुण्य भूमीत तुम्ही झाड कापता, काही वाटत नाही का?, तपोवनावरून उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्रात कुठल्याही शहरात गेलं तरी समस्या सारख्याच : फक्त शहराचे नाव बदला
Nashik Municipal Corporation Election
उद्धव ठाकरे
Published on
Updated on

Municipal Corporation Election नाशिकच्या पुण्य भूमीवर कुंभमेळ्यासाठी तुम्ही झाडे कापत आहात. कुंभमेळा झाला की हीच रिकामी जागा तुम्ही बिल्डरांच्या घशात घालणार आहात. राम मंदिर केला म्हणून तुम्ही डंका पिटलात, पण राम जिथे तपाला बसले होत्‍या अशा तपोभूमीतील झाडे कापण्याचे पाप तुम्ही करत आहात. फार थोड्या ठिकाणी राम तपश्चेर्येला बसले होते यामध्ये नाशिक आहे तपोवन आहे अशा ठिकाणी तुम्ही झांडाची कत्तल करता आहात. म्हणजे भाजपचे हिंदूत्‍व खरे नसून हे चुनावी आहे हे सिद्ध हाते. धर्माची पट्टी अशी डोक्याला लावता की तुमी अंधभक्त होतात. संपर्ण सत्‍यानाश करण्याचा घाट भाजप घालत आहे. अशा थेट शब्दात भाजपवार उद्धव ठाकरे यांनी निशाना साधला.

Nashik Municipal Corporation Election
Raj Thackeray : उमेदवार फोडण्यासाठी भाजपाकडे कोट्यवधी रुपये येतात कुठून? - राज ठाकरे

महापालिका निवडणूकीच्या रणसंग्रामात शिवसेना - मनसे प्रथमच एकत्र निवडणूका लढवत आहेत या दोन्ही पक्षांची संयुक्त सभा नाशिकमध्ये पहिल्यांदा पार पडली. यावेळी ते सभेला संबोधित करत होते यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे, संजय राऊत तसे नाशिक मनपाचे उमेदवार व शिवसेना मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही विकासासाठी दोन भाऊ एकत्र आलो आहेत. लोक म्हणतात सत्तेसाठी एकत्र आले म्हणतात पण होय आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय पण तुमचा विकास करण्यासाठी, राज यांनी राज यांनी नाशिकला केलेली कामे अभिमानाने सांगितली जातात, शिवसेनेनं मुंबईला केलेली कामे आहेत दोन काम करणारे भाऊ एकत्र आल्यावर विचार करा तुमचा उत्कर्ष होईल असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

पुढे त्‍यांनी भाजपाने राज्याची बरबादी केली आहे याची लेखाजोखा मांडला. राज्यात भाजपाची सत्ता आहे. पण प्रत्‍येक शहरात त्‍याच समस्या आहेत. मुळात राज्यातील सर्वच शहरात रस्त्‍यांची अवस्था बिकट आहे. पाण्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कोणत्‍याही शहरात जावा समस्या त्‍याच फक्त शहराचे नाव बदले जाते.

मुंबईमध्ये शिवसेनेने महापालिकांच्या शाळा चांगल्या केल्या आहे. आठ भाषांमधून या शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. महापालिकेचा शाळा या अभिमानाचा विषय असेल हे लक्षात ठेवा. नाशिकमध्येही आम्ही अशा शाळा करु. तुम्ही पैसे घेऊन मतदान करु नका आमचं सोडून द्या तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करा. आम्ही बोलतो ते करून दाखवतो हे लक्षात ठेवा असे आवाहन त्‍यांनी नाशिककरांना केले.

देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते, पण ते इकडे फिरकलेच नाहीत अशी टिका त्‍यांनी केली. राजकारणात ज्यांना पोरं होत नाही ते आमच्या पक्षातील पोरं दत्तक घेतात, तुमचे मोहन भागवत म्हणून टाहो फोडतात त्‍यांचे तरी निदान ऐका भाजपामध्ये कार्यकर्ते उमेदवार तयार करा, दुसऱ्याचे पक्ष फोडून उमेदवारी देता त्‍यामुळे भाजपा हा उपटसुंभाचा पक्ष झाला आहे. मुळ भाजपवाल्यांवर अन्याय झाला आहे. भाजपवले ही सभा चोरून बघत असतील ते म्हणाले भाजपवाल्यांनो तुम्हाला टोमणा मारत नाही पण तुम्हाला वाटत असेल अरे काय नशिबात आलं आहे तुमच्यात … कसं तुम्ही या पक्षात राहता .. ? बाहेरची लोकं येतात आणि तुम्ही रडत आहात अशी टिकाही ठाकरे यांनी केली

भाजप हा उपऱ्यांचा पक्ष

पुढे ते म्हणाले की देवयानी फरांदे रडल्या, त्यांचा मला अभिमान आहे भाजप हा उपऱ्यांचा पक्ष, देवयानी ताई म्हणाल्या दलालांनी ब्रिफिंग केलं म्हणे. त्‍यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते मुनगंटीवार म्हणाले की शनिशिंगणापूरातील घरांना व आमच्या पक्षाला दरवाजा नाही याचा संदर्भ घेत ठाकरे म्हणाले की शनिशिंगणापूरला लोक देवाच्या दर्शनासाठी जातात पण भाजपामध्ये ईडी मागे लागलेले, भ्रष्टाचारी, गुंड असे लोक जात आहेत. माझ्या पाठीत भाजपने वार केला म्हणून मी काँग्रेस बरोबर गेलो पण भाजपने एमआयएम बरोबर अकोटला युती केली, तेव्हा तुमच हिंदूत्‍व कुठं सुटलं असा सवालही त्‍यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news