

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एम.एस्सी. इन फार्मास्युटिकल मेडिसिन, हेल्थ केअर ऑडमिनीस्ट्रेशन व मास्टर्स इन पब्लिक हेल्थ पद् व्युत्तर पदवी अभ्यासक्रासाठी २०२५-२६ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाले. या अभ्यासक्रामांना प्रवेशासाठी अर्ज करण्याची रविवार (दि.१३) ही अंतिम मुदत आहे.
विद्यापीठाचे शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. स्वाती जाधव यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता करीयरच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारे तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नाविण्यपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषध र्निमिती क्षेत्रातील नाविण्यपुर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले
प्रा. डॉ. वैभव आहेर म्हणाले की, एमबीए इन हेल्थ केअर ऑडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमात हॅास्पिटल व्यवस्थापन सेवेचे सुयोग्य नियोजन, रुग्ण सेवेबाबत व्यवस्थापन आदी व्यवस्थापकीय कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रा. डॉ. प्रशांत शिवगुंडे यांनी सांगितले की, विविध रोगांवर उपचाराकरीता औषधे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात यासाठी फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना औषधी उत्पादनांचे संशोधन, विकास, मूल्यांकन, नोंदणी, देखरेख आणि विपणन आदी आरोग्यसेवेच्या पैलूंची माहिती होणार आहे. यामुळे आरोग्य संवर्धनासाठी उपकरणांच्या विकासात योगदान देणारी आव्हानात्मक आणि फायदेशीर कारकीर्द घडवण्याची उत्कृष्ट संधी मिळणार आहे.
मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ हा दोन वषांचा अभ्यासक्रम राज्यातील शासकीय संस्था आणि वैद्यकीय शिक्षणातील आघाडीच्या तज्ञांच्या तांत्रिक मदतीने मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे.