ST Employee Salary | एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुलैपासून मिळणार सुधारित वेतन अन् घरभाडे भत्त्यात वाढ

ST Employee Salary | एसटी कर्मचाऱ्यांना जुलैपासून सुधारित वेतन
ST Employee Salary
एसटी कर्मचार्‍यांची 2600 कोटी रुपये देणी थकीतPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय वार्षिक वेतनवाढ आणि घरभाडे भत्ता देण्याबाबत महत्त्वाचे परिपत्रक महामंडळाने जारी केले आहे. ८ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या या परिपत्रकामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चितीचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळ अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ही कारवाई होणार आहे.

ST Employee Salary
Sattari Waterfall Student | धबधब्यावर विद्यार्थ्याचा मृत्यू प्रकरण: 2 टूर ऑपरेटरना अटक, 4 शिक्षकांवर गुन्हा दाखल!

परिपत्रकानुसार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी निश्चित केलेल्या सुधारित वेतनावर कर्मचाऱ्यांच्या नियत देय तारखेस मूळ वेतनाच्य दोन टक्के संचित दराने वार्षिक वेतनवाढ देणार आहे. तसेच तीन टक्के संचित दराची वार्षिक वेतनवाढ देऊन एसटीमध्ये प्रचलित कार्यपद्धतीनुसार काल्पनिक मूळ वेतन निश्चित करून जुलै २०२६ अखेरपर्यंत वेतननिश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.


दि. १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तात्पुरती वा नियमित पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या दिवशीच्या मूळ वेतनावर दोन टक्के वेतनवाढ दिली असल्यास, त्या दिवशीच्या मूळ वेतनावर दोन टक्केऐवजी तीन टक्के वेतनवाढ देऊन सुधारित वेतननिश्चिती करणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती पदोन्नती पदाच्या किमान टप्प्यापेक्षा कमी असल्यास, ती किमान टप्प्यावर करण्यात येईल.

तसेच नियमित पदोन्नतीच्या प्रकरणात कर्मचाऱ्यांची परिगणित रक्कम पदोन्नती पदाच्या कमाल टप्प्यापेक्षा जास्त असल्यास त्याची वेतननिश्चिती कमाल टप्प्यावर केली जाणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना यापूर्वी दोन टक्के वेतनवाढ दिली असल्यास त्याऐवजी तीन टक्के वेतनवाढ देऊन सुधारित वेतननिश्चिती केली जाणार आहे.
शासन निर्णयानुसार घरभाडे भत्त्याचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार निश्चित केले आहेत. 'एक्स' वर्गासाठी मूळ वेतनाच्छा ३० टक्के, 'वाय' वर्गासाठी २० टक्के, तर 'झेड' वर्गासाठी १० टक्के घरभाडे भत्ता देणार आहे. हा बदल दि. १ एप्रिल २०२६ पासून अनुज्ञेय आहे.

ST Employee Salary
Liquor stock seized raigad : पोलादपूर तालुक्यात 3 लाख 25 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त

सुधारित वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याची अंमलबजावणी करताना वेतननिश्चिती तसेच थकबाकी रकमेबाबत स्वतंत्र निर्णय घेणार असल्याचेही परिपत्रकात नमूद आहे. सुधारित वेतननिश्चितीच्या परिणामी वेतन वा थकबाकीची रक्कम अदा करताना चुकून जास्त रक्कम अदा झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांकडून ती वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.

जवळच्या रुपयापर्यंत पूर्णांकित

दि. १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ज्या कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी अथवा श्रेणीकरण मिळाले आहे, त्यांनाही संबंधित दिवशीच्या मूळ वेतनावर दोन टक्के वेतनवाढीऐवजी तीन टक्के वेतनवाढ देऊन सुधारित वेतननिश्चिती करण्याचे निर्देश आहेत. संबंधित रक्कम अपूर्णांकात आल्यास ती जवळच्या रुपयापर्यंत पूर्णांकित करण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news