MPSC Group C MPSC Exam | MPSC चा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्वपरीक्षा 25 ऑक्टोबरऐवजी आता 3 जानेवारी 2027 ला होणार

MPSC Group C MPSC Exam | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय ; सर्व जिल्ह्यांत परीक्षा केंद्र
exam
exam
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय विभागांतील गट - क संवर्गातील पदे भरण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट - क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा - २०२६ च्या आयोजनात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी परीक्षा आता ३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुध्दीपत्रक प्रसिद्ध केले आहे.

exam
Bhondu Ashok Kharat | भोंदू अशोक खरातचे परराज्यातही जाळे; नाशिक-शिर्डी महामार्गावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेटी

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गट - क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६ च्या आयोजनासंदर्भातील जाहिरात दि. २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर परीक्षेच्या आयोजनाबाबत विविध बाबींचा विचार करण्यात आला.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांची उपलब्धता, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था, परीक्षार्थींना परीक्षा केंद्रामध्ये वेळेत व सुरक्षितपणे पोहोचण्याची शक्यता तसेच परीक्षा सुरळीत, शांततापूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय बाबींचा आयोगाने आढावा घेतला.

exam
Bhondu Ashok Kharat | भोंदू अशोक खरातचे परराज्यातही जाळे; नाशिक-शिर्डी महामार्गावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेटी

याशिवाय राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२६, सणासुदीचा कालावधी, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि हिवाळी अधिवेशन आदी बाबींचाही विचार करण्यात आला. त्यानुसार पूर्वी निश्चित केलेली दि. २५ ऑक्टोबर २०२६ ची परीक्षा पुढे ढकलून आता दि. ३ जानेवारी २०२७ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षेची वेळ आणि अन्य आवश्यक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचनांकडे नियमितपणे लक्ष देऊन अद्ययावत माहिती पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news