Mormugao Port | सडा मुरगाव येथील प्रसिद्ध 'मुरगावचा राजा'च्या जागेला 'एमपीए'कडून कडक पोलिस बंदोबस्तात कुंपण घालण्यास सुरुवात

Mormugao Port | कडक पोलिस बंदोबस्तात काम सुरू; जिल्हा प्रशासनासह पोलिस, एमपीएच्या अधिकाऱ्यांची कामावर देखरेख
Mormugao Port
Mormugao Port
Published on: 
Updated on: 

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव पतन प्राधिकरणाने (एमपीए) सडा, मुरगाव येथे 'मुरगावचा राजा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागेवर बुधवारी (दि. ४) सकाळी कडक पोलिस बंदोबस्तात कुंपण घालण्याचे काम सुरू केले. या जागेवरील अनधिकृत शेड (मंडप) गेल्या महिन्यात पाडण्यात आली होती. तेथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये आणि जागेचे संरक्षण व्हावे, यासाठी एमपीएने कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Mormugao Port
Kazakhstan Charter Flight | कझाकस्तानहून आलेल्या पहिल्या चार्टर विमानाचे दाबोळी विमानतळावर पर्यटन खात्याकडून दिमाखदार स्वागत

या कारवाईसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्त पुरवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बुधवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. कुंपण उभारण्याचे काम शांततेत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पार पाडावे, यासाठी घटनास्थल मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि एमपीएचे वरिष्ठ अधिकारी या कामावर देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित होते.

दक्षिण गोवाच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, मुरगावचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर, मुरगावचे मामलेदार प्रवीणजय पंडित, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पोलिस अधीक्षक नालास्को रापोझ, मुरगावचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, मुरगाव पोलिस निरीक्षक शौरिफ जॉकिस, एमपीएचे अधिकारी तसेच अन्य सरकारी अधिकारी उपस्थित होते.

Mormugao Port
Dabolim Airport | दाबोळी विमानतळावर आगीचा थरार! शॉर्टसर्किटमुळे गोदामात भडका; प्रवाशांमध्ये मोठी घबराट

दोन दिवसांत काम होणार पूर्ण

या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कुंपण उभारण्याची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी बुधवारी संध्याकाळी दिली.

कुंपण उभारण्याचे काम बुधवारी उशिरा संध्याकाळपर्यंत किंवा गुरुवारी पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. काम सुरू असताना जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थल उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.