'एसएमबीटी'मध्ये तीन महिन्यांत 50 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार | SMBT, Nashik

SMBT | आरोग्यसाधना शिबिर : ३१ ऑक्टोबरपर्यंत रुग्णांना लाभ
SMBT - Sevabhavi Trust hospital
एसएमबीटी हॉस्पिटलpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : सर्वसामान्य रुग्णांना मोफत आणि परवडतील अशा दरांत जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्यात एसएमबीटी हॉस्पिटलला (SMBT - Sevabhavi Hospital) यश आले आहे. यंदाच्या आरोग्यसाधना शिबिरास राज्यातील अनेक भागांतील रुग्णांनी उपचार घेतले असून, गेल्या तीन महिन्यांत 50 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, तर चार हजारांहून अधिक जटील शस्त्रक्रिया या शिबिरांतर्गत झाल्या आहेत. विशेष म्हणजे शासकीय योजनेत न बसणाऱ्या शस्त्रक्रियादेखील अल्पदरात झाल्या आहेत. या शिबिराला महिनाभर मुदतवाढ देण्यात आली आहे.

महिनाभर राहणार आरोग्यसाधना शिबिर

कमीत कमी दरांत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलकडून प्रयत्न केले जात आहेत. कुठलीही व्यक्ती आर्थिक अडचणीमुळे आरोग्यसेवा, सुविधा यांपासून वंचित राहू नये, हा या शिबिराचा उद्देश आहे. दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत आरोग्यसाधना शिबिर सुरू करण्यात आले. या अंतर्गत विविध उपचार मोफत आणि सवलतीच्या दरांत झाले. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या अंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत आहेत. तसेच योजनेत समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी इतर ठिकाणी मोठा खर्च येतो. मात्र, येथे शासकीय योजनेत समाविष्ट नसलेल्या विविध शस्त्रक्रिया आरोग्यसाधना शिबिरात परवडणाऱ्या दरात करण्यात आल्या. आंतररुग्ण विभागात 10 हजारांहून अधिक रुग्ण दाखल झाले होते. यातील चार हजार 253 रुग्णांवर जटील शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच 300 हून अधिक ॲन्जिओप्लास्टी, 200 हून अधिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दरम्यान आरोग्यासेवांपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी शिबिराला पुढील महिनाभर मुदतवाढ देण्यात आली आहे.

रुग्ण व नातेवाइकांकडून उपचारावर समाधान व्यक्त करत आयसीयू व्यतिरिक्त स्वतंत्र बेड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने एका वर्षात सुसज्ज २०० बेड्सचे एसएमबीटी केअर प्लस ही प्रायव्हेट विंग सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील अनेक रुग्ण याठिकाणी उपचारार्थ दाखल झाले आहेत.

सचिन बोरसे, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, नाशिक.

आरोग्यसाधना शिबिरातून अविरत रुग्णसेवा केली जात आहे. मागील तीन महिन्यांत ५० हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी व उपचार झाले. रुग्णांच्या आग्रहास्तव शिबिर एक महिना पुढे सुरू ठेवण्यात येत असून, अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा.

डॉ. मीनल मोहगावकर, अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news