

नाशिक : युध्दजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सतर्क करण्याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे शहरात नऊ ठिकाणी सायरन बसविण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाने मंगळवारी (दि.६) केलेल्या तपासणीत नऊपैकी चार सायरन बंद स्थितीत आढळून आले. त्यामुळे सायरनची दुरुस्ती करण्यासाठी नागरी संरक्षण दलास धावपळ करावी लागली. दरम्यान, राज्यात १६ तर नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी हवाई हल्ल्याचे संकेत देणारे असेल.
सायरन वाजवून युध्दजन्य परिस्थितीची पुर्व तयारी 'मॉक ड्रिल'द्वारे केली जाणार आहे. जिल्ह्यात सिन्नर, मनमाड आणि नाशिक मध्ये मॉक ड्रिल होणार आहे. बुधवारी (दि.७) 'मॉक ड्रील' घेण्यात येणार आहे. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने विविध राज्यांना हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजविण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिकमध्ये देखील या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी नागरी संरक्षण दलाकडे सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यात सिन्नर, मनमाड आणि नाशिक शहरात मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय
बी.वाय.के कॉलेज, कॉलेजरोड
महापालिका विभागीय कार्यालय, मेनरोड
जिल्हा परिषद कार्यालय, त्र्यंबक नाका
गांधीनगर प्रिंटींग प्रेस, नाशिकरोड
झाकिर हुसेन हॉस्पिटल, कथडा
नेहरुनगर कस्टेडियन, नाशिकरोड
जुने महापालिका विभागीय कार्यालय, नाशिकरोड
ट्रान्झिस्ट होस्टेल, आय.एस.पी. नाशिकरोड
पिवळा दिवा : हवाई हल्ला होण्याची शक्यता असल्यास पिवळा संदेश मिळतो. हा संदेश अेआरपी यंत्रावरील दूरध्वनीवरून अतिमहत्वाच्या व्यक्तींना व कंपन्यांना दिला जातो.
पांढरा दिवा : पिवळ्या दिव्याद्वारे दिलेला हवाई हल्ल्याचा संदेश रद्द् म्हणून पांढऱ्या रंगाचा दिवा दिला जातो.
लाल दिवा : काही मिनिटांत हवाई हल्ला होणार असल्याचा संदेश लाल दिव्याद्वारे दिला जातो. हा संदेश सामान्य नागरिकांना सायरन व्दारे दिला जातो. यामध्ये सायरन कमी - अधिक आवाजात दोन मिनिटे वाजविला जातो.
हिरवा दिवा : सायरन एकाच आवाजात दोन मिनिटे वाजविला जातो.