Mobile based Stock market investment : शेअरबाजारात मोबाईल ट्रेडिंगचा हिस्सा झेपावला 28 टक्क्यांवर

स्मार्ट, सुरक्षित ट्रेडमुळे मोबाइल आधारित गुंतवणुकीने घेतली गरुडझेप
नाशिक
डेस्कटॉप ट्रेडिंगला सोयीस्कर पर्याय म्हणून सुरू झालेले मोबाईलरुपी व्यासपीठ युवा पिढीच्या गळ्यातील ताईत बनले आहे. Pudhari News Network
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • मोबाईल शेअर ट्रेडिंगचे स्वरूप लक्षणीय स्वरुपात बदलले

  • युवा पिढीच्या गळ्यातील ताईत: मोबाईल आणि ॲपच्या माध्यमातून सुमारे ३२ ट्रिलीयन रुपयांचे व्यवहार

  • मोबाईल ट्रेडिंगचा आता एका रोमांचक टप्प्यात प्रवेश

Transactions worth around Rs 32 trillion through mobile and apps

नाशिक: गेल्या दशकात मोबाईल शेअर ट्रेडिंगचे स्वरूप लक्षणीय स्वरुपात बदलले आहे. डेस्कटॉप ट्रेडिंगला सोयीस्कर पर्याय म्हणून सुरू झालेले मोबाईलरुपी व्यासपीठ युवा पिढीच्या गळ्यातील ताईत बनले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अहवालातील आकडेवारीनुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात कॅश आणि डेरिव्हेटीव्हचे एकूण ११४ ट्रिलीयन रुपयांचे व्यवहार झाले असून त्यात मोबाईल आणि ॲपच्या माध्यमातून सुमारे ३२ ट्रिलीयन रुपयांचे व्यवहार झाले आहे. एकूण व्यवहारात मोबाईल ट्रेडिंगचा हिस्सा सुमारे २८ टक्के इतका आहे. हा हिस्सा भविष्यात आणखी वेगाने वाढण्याचा अंदाज विविध सरकारने व्यक्त केला आहे.

नाशिक
Share Market : ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'चा गुंतवणूकदारांवर परिणाम नाही, शेअर बाजारात किरकोळ घसरण

तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती आणि ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये झालेल्या बदलामुळे मोबाईल ट्रेडिंग आता एका रोमांचक टप्प्यात प्रवेश करत आहे. युवा पिढीसाठी अनेक ऑनलाईन मंच उपलब्ध झाल्याने ते मोबाईलच्या माध्यमातून गुंतवणूक करत आहे, तसेच शेअर ट्रेडिंगही करत आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मोबाईलच्या माध्यमातून ट्रेडिंगचे प्रमाण तब्बल ३७ ते ४० टक्क्यांपर्यंत पोहचले होते. परंतु नंतर त्यात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.

मोबाईल ट्रेडिंगच्या भविष्याला आकार देणारे प्रमुख प्रवाह

१) एआयमुळे मिळालेली ताकद

मोबाईल ट्रेडिंगच्या अनुभवामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्रांती घडवत आहे. ट्रेडिंग पॅटर्न, त्यांच्या भावनांचे तत्काळ विश्लेषण आणि ग्राहकांना मदतीसाठी एआय-संचालित चॅटबॉट्सवर आधारित वैयक्तिक शिफारसी हे घटक गुंतवणूकदारांचा बाजारपेठांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत सातत्याने सुधारणा घडवून आणत आहेत. एआयमुळे भाकितांबाबतचे विश्लेषण, कौशल्यपुर्वक ट्रेडींगची अंमलबजावणी याचा लाभ ट्रेडर्सला होईल. गुंतवणूकीची प्रक्रिया डेटावर आधारित होत चालली आहे.

२) शेअरबाजारातील व्यवहारांना आकर्षक रुप

शेअरबाजारातील गुंतवणूकदाररुपी ट्रेडर्सचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी ट्रेडिंग मंच लीडरबोर्ड(व्यवहारांची एकत्रित माहिती), अचिव्हमेंट बॅज (मिळविलेले यश), सिम्युलेटेड ट्रेडिंग (सरावासाठीचे व्यवहार) आणि लाभावर आधारलेले लर्निंग मॉड्यूल आदी सुविधा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूक अधिक परस्परसंवादी झाली आहे. तसेच ती शिकत जाण्यासारखी बनली आहे. तरीही अधिक जोखीम घेण्यास प्रोत्साहनाऐवजी आर्थिक साक्षरता वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

३) सामाजिक सहकार्यातून सामुदायिक व्यापाराचा उदय

गुंतवणूकदार आता शेअरबाजारात एकटे व्यवहार करत नाहीत. सामाजिक स्वरुपातील ट्रेडिंगची वैशिष्ट्ये लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदाररुपी ग्राहक अनुभवी ट्रेडर्सच्या वाटचालीचा मागोवा घेऊ शकतात, आपला दृष्टीकोन सादर करु शकतात आणि त्यांच्या व्यवहारांचे अनुकरण करू शकतात. शेअरबाजारातील ट्रेडिंगबाबत ज्ञानाचे लोकशाहीकरणाने ज्ञानसंपन्न गुंतवणूकदारांची संख्याही वाढत आहे.

४) ग्राहकांच्या अनुभवात अत्याधुनिकता

नवीन साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्तीचा अनुभव (यूएक्स) हा मोबाइल ट्रेडिंग उत्क्रांतीचा गाभा ठरला आहे. ट्रेडिंग ॲप्सचे भविष्य मुख्यत: अंतर्ज्ञानावर आधारलेला संवाद म्हणजेच इंटरफेस, ग्राहक अनुरूप माहिती सादर करणारा डॅशबोर्ड तसेच क्षणोक्षणी दिल्या जाणाऱ्या सूचनांमध्ये दडलेले आहे. तसेच गुंतवणूक विश्लेषणाला ऑगमेंटेड रिॲलिटी आणि व्हर्च्युअल रिॲलिटी सारखी सुधारित व्हिज्युअलायझेशन साधने नवीन रुप देणार आहेत.

५) प्रगत सुरक्षेतून विश्वासाला पाठबळ

गुंतवणूकदारांचा डेटा आणि व्यवहारांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोबाइल ट्रेडिंग मंच बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रगत एन्क्रिप्शन पध्दती, फसवणूक झाल्यास तत्काळ शोध आणि ब्लॉकचेन-आधारित सुरक्षा चौकटीला प्राधान्य देण्यावर भर देत आहे. माहितीची (डेटा) गोपनीयता आणि नैतिक पध्दतीने एआयचा वापर सुनिश्चित करण्यासाठी सरकारी नियामक संस्था या प्रगतीवर लक्ष ठेवतील.

नाशिक
Kaiga Project Electricity Share | कैगा प्रकल्पातून राज्याला मिळणार 50 टक्के वीज

शेअरबाजारातील या रोमहर्षक परिवर्तनातून मार्गक्रमण करत असताना, आमचे लक्ष अंतर्ज्ञानाने ओतप्रोत भरलेला, कुशल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदार-केंद्रित मोबाइल ट्रेडिंग अनुभव देण्यावर केंद्रीत राहणार आहे.

संदीप चोरडिया, सीओओ, कोटक सिक्युरिटीज

भविष्याचा वेध

मोबाईल ट्रेडिंगचे भविष्य अतिशय वेगवान आणि गतिमान राहणार आहे. सतत शिकण्याची सुविधा, सामाजिक कनेक्टिव्हिटी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करणाऱ्या व्यापक परिसंस्थांमध्ये ट्रेडिंगचे मंच विकसित होत असताना, माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक साधने गुंतवणूकदारांना उपलब्ध राहणार आहेत. सर्व गुंतवणूकदारांना अधिकाधिक सक्षम करतानाच नवीन वैशिष्ट्ये ट्रेडींगचा प्रवास अतिशय सुटसुटीत करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news