MLAs Vision Nashik | एकच ध्यास आता जिल्ह्याचा विकास

आमदारांचे 'व्हिजन नाशिक' : सिंहस्थ नियोजन, आयटी पार्क, उद्योग विकास, सिंचन सुविधा, रोजगार, महिला सक्षमीकरणाचा समावेश
MLAs Vision Nashik
पक्षभेद विसरून नाशिक जिल्ह्याचा विकास साधणे हा एकमेव अजेंडा घेऊन आमदार नाशिकच्या विकासासाठी सरसावले आहेत. Pudhari News network
Published on
Updated on

नाशिक : आमदारकीची शपथ घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वच 15 मतदारसंघांतील आमदार आता कामाला लागले आहेत. पक्षभेद विसरून नाशिक जिल्ह्याचा विकास साधणे हा एकमेव अजेंडा घेऊन आमदार नाशिकच्या विकासासाठी सरसावले असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघनिहाय जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन या आमदारांनी मांडले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे सुयोग्य नियोजन, आयटी पार्क, लॉजिस्टीक पार्क, उद्योग विकास, सिंचन सुविधा, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण आदी महत्वाकांक्षी योजना आमदारांच्या अजेंड्यावर आहेत.

छगन भुजबळ आमदार, येवला

  • येवल्यातील औद्योगिक वसाहतीला चालना देणार

  • लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणार

  • शेती सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यातून पाणी उचलणार

  • लासलगाव, धुळगाव, राजापूर पाणी योजना कार्यान्वित करणार

  • पैठणीला उर्जितावस्था देण्यासाठी योजना राबविणार

दादा भुसे आमदार, मालेगाव बाह्य

  • नार- पार, गिरणा प्रकल्प पूर्ण करणार

  • रावळगाव - अजंग औद्योगिक वसाहत

  • छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचा

  • दुसरा टप्पा महत्वाकांक्षी भुयारी गटार प्रकल्प

  • पूर्णत्वास नेणार आरोग्य सुविधांची कामे शीघ्र गतीने मार्गी लावणार

ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व

  • सिंहस्थ कुंभमेळ्याचे सुयोग्य नियोजन करणे

  • मिरची चौक व नांदूर नाका येथे दोन उड्डाणपूल

  • पंचवटी अमरधाममध्ये विद्युतदाहिनी बसविणे

  • शंभर खाटांचे रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती.

  • आडगाव येथे आयटी पार्क, लॉजिस्टीक पार्कची उभारणी

प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य

  • सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीतून नाशिकचा विकास

  • जुने नाशिक भागात क्लस्टर योजनेची अंमलबजावणी

  • संदर्भसेवा रुग्णालयाचे विस्तारीकरण, महिला रुग्णालयाचे उद्घाटन

  • 'ड्रग्जमुक्त नाशिक' साठी विविध उपाययोजना

  • सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांची उभारणी

नरहरी झिरवाळ, आमदार, दिंडोरी-पेठ

  • नार-पार वळण योजनेतंर्गत एकदरा योजना राबविणार

  • मांजरपाडा-२ योजनेंतर्गत कालवा काढून जलसिंचन वाढविणे

  • ओझरखेड धरण, वणी देवी पर्यटन विकास योजना

  • देवसाने २२० केव्ही सबस्टेशनची उभारणी करून वीजप्रश्न सोडविणार

  • जांबुटके आदिवासी क्लस्टरला चालनासह, पेठ औद्योगिक वसाहतसाठी प्रयत्न

डॉ. राहुल आहेर, आमदार, चांदवड-देवळा

  • पार-गोदावरी प्रकल्पाद्वारे चांदवडचा पाणी प्रश्न सोडविणार

  • नार-गिरणा प्रकल्पाद्वारे देवळ्याचा पाणीप्रश्न सोडविणार

  • सनकापूर वाढीव कालव्याची वहनक्षमता वाढविणार.

  • पुणेगाव दरसवाडी कालव्याद्वारे पाझर तलाव भरण्याचे प्रयत्न

  • मतदार संघातील राहिलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार.

हिरामण खोसकर, आमदार, ईगतपुरी- त्र्यंबकेश्वर

  • मतदार संघातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार

  • एमआयडीसीत नव्या कंपन्यांना प्राधान्य देणार

  • ग्रामीण भागात आरोग्य केंद्र नव्याने वाढविणार

  • अतिदुर्गम भागात नव्याने रस्ते बांधण्यात येणार

  • भाताला हमीभाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार

मौलाना मुफ्ती इस्माईल, आमदार, मालेगाव मध्य

  • वाडियासह इतर रुग्णालय सुरु करणार

  • वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न करणार

  • मालेगाव नशामुक्त अभियान राबविणार

  • यंत्रमागाचे प्रश्न शासन दरबारी मांडणार

  • भुयारी गटार योजनेचे काम प्राधान्याने करणार

सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

  • सिडकोतील घरे फ्री होल्ड निर्णयाची अंमलबजावणी

  • लाडक्या बहिणींना दर महिना २१०० रुपये मिळवून देणार

  • शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १५ हजार

  • प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे प्रयत्न

  • कौशल्य विकास अंतर्गत कामगारांना प्रशिक्षण

सरोज अहिरे, आमदार, देवळाली

  • देवळाली कॅम्प शहर पाणीपुरवठा योजना

  • गिरणारे टोमॅटो मार्केटमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी

  • राजुर बहुला एमआयडीसीत मोठा गुंतवणूक प्रकल्प

  • शेतशिवारातील रस्ते तयार करणे

  • एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पाचे पुनरूज्जीवन

ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

  • उद्योग, शेतीसाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता

  • वासाळी येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक

  • देवनदी, कडवा, भोजापूर लाभक्षेत्रात वाढ करणार

  • महिला, युवकांसाठी रोजगार निर्मितीचे पर्याय वाढविणार

  • दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणार.

दिलीप बनकर, आमदार, निफाड

  • निफाडला शिवसुष्टी प्रकल्प उभारणार

  • पिंपळगावला क्रीडा संकुलाची निर्मिती

  • शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी प्रयत्न

  • ड्रायपोर्ट उभारणीसाठी पाठपुरावा; रोजगार देणार

  • * आरोग्य यंत्रणेला बळकटी देणार

सुहास कांदे, आमदार, नांदगाव

  • शेतीला बारमाही पाणी उपलब्ध करून देणार

  • नांदगाव येथे अद्ययावत सुविधांचे ट्रॉमा केअर सेंटर

  • गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा- स्मारक

  • तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे

  • महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी

नितीन पवार, आमदार, कळवण-सुरगाणा

  • कळवणला शासकीय तंत्रनिकेतन, कृषी, नर्सिंग, महाविद्यालय कळवण - सुरगाणा तालुक्यात औद्योगिक वसाहत

  • नार, पार, अंबिका, औरंगा, ताण, पुनंद, गिरणा नद्यांवर साखळी बंधारे

  • सुरगाणा तालुक्यात दुमी धरण बांधण्याचा प्रयत्न

  • कळवण येथे वरिष्ठ विभाग दिवाणी, फौजदारी न्यायालयासाठी प्रयत्न

दिलीप बोरसे, आमदार, बागलाण

  • औद्योगिक वसाहत निर्माण करून रोजगार वाढविणार

  • भगवान एकलव्य तसेच महाराणा प्रताप प्रेरणास्थळ

  • सटाणा शहरात सीसीटीव्ही, तसेच क्रीडासंकुल उभारणे

  • गाव तेथे डिजिटल लायब्ररी संकल्पना राबवणार.

  • ताहराबादला ट्रामा सेंटर, दुर्गम भागात फिरते रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news