MLA Hiraman Khoskar | वरिष्ठांच्या वादामुळे आमदार हिरामण खोसकर 'सेफ झोन'मध्ये

निलंबनाचा निर्णय विरला हवेत
MLA Hiraman Khoskar
वरिष्ठांच्या वादामुळे आमदार हिरामण खोसकर 'सेफ झोन'मध्येfile photo

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंगमुळे आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याच्या शक्यता वर्तविण्यात येत होत्या. मात्र, राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठांमध्ये असलेल्या छुप्या वादामुळेहे सर्व आमदार सेफ असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांमध्ये जिल्ह्यातील हिरामण खोसकर यांचे नाव असल्याच्या चर्चा असल्या तरी कारवाई कधी होईल, त्यावर काय होईल या सर्व चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.

क्रॉस व्होटिंगप्रकरणी पक्षांतर्गत कारवाईची टांगती तलवार असलेले आ. खोसकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते. मात्र, आ. खोसकरांनी मतदारसंघातील अतिक्रमणाच्या कामासाठी भेट घेत असल्याचे स्पष्ट केले होते. राज्यातील काँग्रेसमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये छुपे वाद असल्याच्या चर्चा लपून राहिल्या नाहीत. या दोघांच्या वादामध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींना निर्णय घेता येत नसल्याचे समजते. त्यामुळे क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांचे निलंबन करण्याचा निर्णय हवेत विरून गेला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, काँग्रेसमधील एका गटाने पक्षश्रेष्ठींना सुचविल्यानुसार, ज्या आमदारांचे निलंबन करायचे त्यांनी केलेली विकासकामे, मतदारसंघात पुन्हा निवडून येतील का?, मतदारसंघावर त्यांची असलेली पकड यांचा विचार करण्यात येत आहे. जर निलंबन केले तर पुढच्या तीन महिन्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच त्यामुळे आहे ती जागा हातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच या निर्णयाला विलंब होत असल्याचे समजते आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news