

ठळक मुद्दे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपक्रम
गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचा पुढाकार; रेंडाळेत २६,००० झाडे लावणार; ७ हजार वृक्षलागवड पूर्ण
वाई बोथी येथे २५,००० झाडे लावणार; ३ हजार ५०० लागवड पूर्ण; वडगाव बल्हे इथे एका एकरात तालुक्यातील पहिली सघन लागवड
येवला, नाशिक : संतोष घोडेराव
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून येवला तालुक्यात सुमारे तीन लाख वृक्षलागवडीच्या कामाला मंजुरी मिळाली असून पर्यावरण संवर्धन, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकास यांचा संगम घडवणारा या उपक्रमाच्या माध्यमातून येवला तालुक्यात 'मियावाकी फॉरेस्ट' तयार होणार आहे.
'मनरेगा' अंतर्गत येवला तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या हद्दीत 'मियावाकी फॉरेस्ट' ही वृक्षलागवडी केली जाणार आहे. या उपक्रमासाठी एकूण ६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, त्यापैकी ९० टक्के रक्कम (सुमारे ५४ कोटी रुपये) ही थेट स्थानिक मजुरांच्या खात्यात वेतनरूपाने जाणार आहे. प्रत्येक झाडाच्या तीन वर्षांच्या संगोपनासाठी २,००० रुपये खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे सप्रेम अशासकीय संस्था, डॉर्फ केटल, नवदृष्टी संस्था आणि पंचायत समिती येवला यांच्या संयुक्त प्रयत्नातून भारम येथे एक हजार आंब्याची लागवड पूर्ण झाली आहे.
'मियावाकी फॉरेस्ट' काय आहे?
जपानचे वनशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली सघन लागवड पद्धत म्हणजे 'मियावाकी फॉरेस्ट'. यामध्ये स्थानिक ४०-४२ जातींच्या झाडांची दाट लागवड (एका एकरात साधारण १०,००० झाडे) लावली जातात. ही झाडे नैसर्गिक पद्धतीने वाढत जाऊन जंगलासारखी एकमेकांत मिसळून जातात. नैसर्गिक जंगलापेक्षा दहापट जलद वाढ व ३० पट अधिक घनदाट वनस्पती यात वाढतात. ही झाडे वर सूर्यप्रकाश आणि खाली जमिनीत पाण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत वेगाने वाढतात. यातून स्थानिक पक्षी
प्राणी यांना आसरा तयार होतो. मजुरांना प्रोत्साहनासाठी 'मँगो कप' स्पर्धा
ज्या शेतकऱ्यांनी किंवा मजुरांनी झाडे चांगली वाढवली त्यांना सलग तीन वर्षे मजुरी देऊन गौरविण्यात येणार आहे. चौथ्या वर्षापासून झाडांपासून होणाऱ्या उत्पन्नाचा ५० टक्के हिस्सा ग्रामपंचायतीला नियोजन पूर्ण झाले असून, आणि ५० टक्के मजुरांना मिळणार आहे. सध्या तीस ग्रामपंचायतींचे आणखी चाळीस ग्रामपंचायती सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या माध्यमातून येवला तालुका 'हरित, समृद्ध आणि स्वावलंबी' करण्याचे उद्दिष्ट आहे.
आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड
मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेंडाळे येथे तीस हजार झाडे लावली असून, वाईबोथी येथे ३५०० वृक्षलागवड केली आहे. भारममध्ये एक हजार आंब्याची झाडे लागवड केल्याची माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली.
मानवाने विकासाच्या नावाखाली सुरू केलेला निसर्गाचा विनाश विध्वंसामध्ये रूपांतरित झाला आहे. पर्यावरण संवर्धन काळाची गरजच नसून जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठीची लढाई बनली आहे.
संदीप वायाळ, गटविकास अधिकारी, येवला
'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' या म्हणीचा प्रत्यय येवल्याच्या उत्तर पूर्व भागात येत आहे. या भागात वृक्षलागवडीने भूजल पातळीत वाढ होणार आहे. शिवाय खात्रीशीर रोजगार मिळणार आहे.
भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती, येवला
संवर्धनासाठी 'मँगो कप स्पर्धा' होणार
ज्या शेतकऱ्यांनी किंवा मजुरांनी झाडे चांगली वाढवली त्यांना सलग तीन वर्षे मजुरी देऊन गौरविण्यात येणार आहे. चौथ्या वर्षापासून माय ट्री पॅटर्न संकल्पनेतून झाडांपासून होणाऱ्या उत्पन्नाचा ५० टक्के ग्रामपंचायतीला आणि ५० टक्के मजुरांना विभागणी मिळणार आहे. सध्या तीस ग्रामपंचायतींचे नियोजन पूर्ण झाले असून, आणखी चाळीस ग्रामपंचायती सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. या माध्यमातून येवला तालुका हरित, समृद्ध आणि स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट साधणार आहे.