Girish Mahajan AI Photo Controversy| एआय वापरून माझे खोटे फोटो तयार केले: मंत्री महाजन

Girish Mahajan AI Photo Controversy| विरोधकांनी सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल केल्याचाही दावा
Girish Mahajan
Girish MahajanPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर व्हायरल झालेले आक्षेपार्ह फोटो हे मूळ नसून, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले बनावट फोटो असल्याचे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. ती मुलगी माझ्या दिवंगत मित्राची मुलगी असून, तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे, असा खुलासा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी करीत विरोधकांच्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला.

Girish Mahajan
Crime News: इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली सापळा; तरुणींनी सोशल मीडियावर सावध राहण्याची गरज

त्यामुळे महाजन यांच्या व्हायरल फोटो प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. रविवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत मंत्री महाजन यांनी स्वतः व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह फोटोबाबत खुलासा केला. आपल्या कुटुंबाचे मूळ फोटो दाखवित संपूर्ण प्रकार समोर आणला. महाजन म्हणाले की, माझ्याशी संबंधित फोटो शेअर केले जात आहेत.

या संदर्भात मी खुलास करत आहे. ती मुलगी माझ्या मित्राची मुलगी आहे. तिचे वडील आज हयात नाहीत. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मी काही फोटो दाखवतो त्यांच्या फॅमिलीसोबतचे, गणपती किंवा इतर ठिकाणचे. ते मुंबईत येतात माझ्या मुलीसोबत, मात्र तेच फोटो व्हायरल केले जात आहेत. सेल्फी फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले जात आहेत. त्यात काही फोटो सेल्फी आहेत, काही फोटो क्रॉप केले आहेत, तिथे माझी पत्नी, मुली आहेत. एआय वापर करून हे फोटो व्हायरल केले जात आहेत, अशामुळे काहींना आयुष्यातून उठावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. राजकारण आहे, त्यात आपण लढू. मात्र, हे जाणीवपूर्वक असे फोटो व्हायरल केले जात आहेत. मी सायबर सेलमध्ये तक्रार दिली आहे. त्याचे सर्टिफिकेट मला मिळाले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Girish Mahajan
Raj Thackeray on Nasrapur crime: 'मनाचा थरकाप उडाला... कायदा काय सांगतो याचा विचार करून नका, त्याला हालहाल करून संपवा'

बदनामी करणाऱ्यांची लिस्ट माझ्याकडे तयार

आपली आणि एका कुटुंबाची सामाजिक बदनामी करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही, असा इशारा देत मंत्री महाजन यांनी कायदेशीर लढाईची घोषणाही यावेळी केली. याप्रकरणी मी उच्च न्यायालयात जाणार आहे. हे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्याची लिस्ट माझ्याकडे आहे, असे सांगत महाजन यांनी कौटुंबिक फोटो प्रसारमाध्यमांना दाखविले, ज्यात त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि ती संबंधित मुलगी एकत्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर

मंत्री महाजन म्हणाले की, हे फोटो शेअर केले जात आहेत. सेल्फी क्रॉप करून व्हायरल केले जात आहेत. मी सायबर आणि पोलिसांत तक्रार केली आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यावर कारवाई केली जाईल, असा मला विश्वास आहे. यात कोण आहे, याची मला कल्पना नाही. मात्र, यावर राजकारण सुरू आहे. त्या मुलीचे लग्न जमवायचे आहे, ती जबाबदारी माझ्यावर आहे, हे चुकीचे केले जात आहे. आपण राजकारण करतो, त्यात दोन हात करू. मात्र, हे जाणीवपूर्वक केले जात आहे. त्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news