

नाशिक : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीईटी सेलने एकूण १९ प्रवेश परीक्षांचे नियोजन जाहीर केले असून, दि. १६ मार्च ते २४ एप्रिल २०२५ या कालावधीत या सर्व प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
मार्च २०२५ मधील परीक्षा याप्रमाणे घेतल्या जातील
१६ मार्च : एम.एड, एम.पीएड.
१७, १८, १९ मार्च : एमबीए, एमएमएस.
२३ मार्च : एमसीए
२४, २५ मार्च : बीएड.
२७ मार्च : एमएचएमसीटी, बी.एड.
२८ मार्च : एमएचएमसीटी (इंटिग्रेटेड)
२८ मार्च : बीएड, एमएड. (इंटिग्रेटेड)
२९ मार्च : बी. डिझाइन
राज्यातील विविध व्यावसायिक पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी सेलमार्फत प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. यामध्ये उच्चशिक्षण, तंत्र शिक्षण व कृषी या तीन विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा समावेश आहे. सीईटी सेलच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर हे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
१, २, ३ एप्रिल : बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएम.
४ एप्रिल : विधी
५ एप्रिल : ए. ए. सी.
७ व ८ एप्रिल : नर्सिंग
८ एप्रिल : डीएपीएन, पीएचएन.
९ ते १७ एप्रिल : एमएचटी - सीईटी (पीसीबी) (१० व १४ एप्रिल वगळता)
१९ ते २७ एप्रिल : एमएचटी - सीईटी (पीपीएम) (२४ एप्रिल वगळून)