MHADA housing scam-कल्पेश पाटील यांच्यावर निलंबनाची शक्यता

म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरण : मनपा नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवणार
MHADA
MHADAPudhari
Published on
Updated on

नाशिक : म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांच्यावर आता निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटील यांच्या अटकेसंदर्भातील अहवाल पोलिसांकडून शुक्रवारी (दि.८) महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला असून, सोमवारी (दि.११) शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

MHADA
Nashik Accident - कांद्यासाठी धाव; काळानेच गाठले !

नाशिक शहरातील म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणी बिल्डर आणि विकासकांनी भूमी अभिलेख विभागाचे बनावट शिक्के, स्वाक्षऱ्या वापरून खोटे मोजणी नकाशे आणि आकारफोड पत्रके तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तब्बल १९७जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सोनू मनवानी यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. महसूल व भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईनंतर पोलिसांनी तपासाची दिशा महापालिकेकडे वळवली. त्यानुसार बुधवारी रात्री नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कल्पेश पाटील हे २०२२ पासून नाशिक महापालिकेत सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार एखादा अधिकारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्यास संबंधित विभागाकडून त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यानुसार आता महापालिका प्रशासनानेही कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

MHADA
Gangapur Dam | गंगापूर धरणात खोदणार चर

सोमवारी प्रस्ताव सादर होणार

पोलिस आयुक्त कार्यालयाकडून अटकेबाबतचा अधिकृत अहवाल शुक्रवारी महापालिकेला पाठविण्यात आला. मात्र, महापालिका आयुक्त मनीषा खत्री या बैठकीनिमित्त मुंबई दौऱ्यावर असल्याने त्याच दिवशी प्रस्ताव पाठविणे शक्य झाले नाही. आता सोमवारी (दि.११) आयुक्तांच्या मान्यतेनंतर नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला जाणार असून, त्यानंतर पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news