मराठवाड्याचं पाण्याचं टेन्शन मिटलं ! जायकवाडी धरण 'इतके' भरले

Jayakwadi Dam | पाण्यावरुन युद्ध टळणार
Gangapur dam nashik
जायकवाडीची तहान भागविल्यानंतर गंगापूर धरणात राहिलेला 93.62 टक्के साठा. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेले जायकवाडी ७० टक्के भरले आहे. धरणात पाण्याची आवक कायम आहे. यंदा धरणात अपेक्षित पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी नाशिक व नगरमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची गरज भासणार नाही.

चालू महिन्याच्या प्रारंभी दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मध्यंतरीच्या काळात 10 दिवस उसंत घेतली होती. पण गेल्या आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने वर्दी दिली. त्यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली. गंगापूर, दारणा, भावली, पालखेड, करंजवणसह १८ धरणांतून विसर्ग केला जात असून आजही तो कायम आहे. तसेच नगर जिल्ह्यातील धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. नाशिक आणि नगर जिल्ह्यांतून साेडलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरण ७० टक्के भरले आहे.

Gangapur dam nashik
Nashik Rain Update | गोदावरीचा पूर ओसरला, परिस्थिती पूर्वपदावर

नाशिक जिल्ह्यातून ३६ हजार ११९ दलघफू म्हणजेच ३६.११९ टीएमसी पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे सोडण्यात आले. तसेच नगर जिल्ह्यातील धरणातून २२ हजार दलघफूच्या आसपास (२२ टीएमसी) पाणी सुटले. साधारणत: ५८ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचले. त्यामुळे जायकवाडीचा जलस्तर ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन्ही जिल्ह्यांतील धरणांमधून अद्यापही पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यामुळे जायकवाडीचा जलस्तर अधिक उंचावण्यास मदत होणार आहे.

यंदा वाद टळणार 

नाशिक व नगर जिल्ह्यांत आठ दिवसांपासून पावसाचा जाेर अधिक आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडीचा साठा सुमारे ५० टक्क्यांनी वाढला आहे. समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडीत ६५ टक्के पाणीसाठा असणे गरजेचे आहे. धरणात सध्या ७० टक्के साठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू वर्षी पाण्यावरून नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा वाद टळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news