Maratha Reservation | शांतता रॅली बंदोबस्तासाठी नाशिकमध्ये पोलिसांचा फौजफाटा

भुजबळ फार्मवर अतिरिक्त बंदोबस्त
Police Recruitment
शांतता रॅली बंदोबस्तासाठी नाशिकमध्ये पोलिसांचा फौजफाटाFile Photo
Published on
Updated on

नाशिक : शहरातून मंगळवारी (दि. १३) मराठा आरक्षण जनजागृतीसंदर्भात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या बंदोबस्तानिमित्त शहर पोलिसांनी नियोजन केले असून, वाहतूक मार्गात बदल केले आहेत. बंदोबस्तात सुमारे १५०० पोलिस अधिकारी व अंमलदारांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. तसेच खबरदारी म्हणून मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी अतिरिक्त बंदाेबस्त तैनात केला आहे.

मराठा समाजास आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी मराठा आंदाेलक मनाेज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याचा समाेराप मंगळवारी नाशिकमध्ये हाेत आहे. त्यासाठी मराठा आंदाेलकांनी रॅलीसह सभेचे नियाेजन केले आहे. सद्यस्थितीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनाेज जरांगे, मंत्री भुजबळ आणि अन्य नेत्यांमध्ये आराेप-प्रत्याराेप सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेस काेणतेही गालबाेट लागू नये यासाठी पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी यांनी बंदाेबस्तासह वाहतुकीचे नियाेजन केले आहे. त्यानुसार सहायक पाेलिस आयुक्त, पाेलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पाेलिस ठाण्यांतील महिला व पुरुष अंमलदार, गुन्हे शाखा, विशेष शाखा, गाेपनीय शाखा यांच्यासह हाेमगार्डचा बंदाेबस्त तैनात राहणार आहे. या पार्श्वभूमीवर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्या हालचालींवर पाेलिसांसह गाेपनीय शाखेचे बारीक लक्ष आहे.

Police Recruitment
Manoj Jarange Nashik | मनोज जरांगे- पाटील यांची आज नाशिकमध्ये रॅली

असा आहे बंदोबस्त

पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पाेलिस उपायुक्त, पाच सहायक आयुक्त, २६ पोलिस निरीक्षक, ५१ सहायक व उपनिरीक्षक, ६७१ पोलिस अंमलदार, १०१ महिला अंमलदार, दोन एसआरपीएफच्या तुकड्या, दोन आरसीपी, एक स्ट्रायकिंग फोर्स, एक शीघ्र कृती दलाची तुकडी असा बंदोबस्त राहणार आहे.

असा आहे रॅली मार्ग

तपोवन येथून स्वामी नारायण चौक - संतोष टी पॉइंट - काट्या मारुती सिग्नल - दिंडोरी नाका - पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅण्ड - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा रॅली मार्ग आहे. यात अंदाजे ३० ते ३५ हजार मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा प्राथमिक अंदाज शहर पाेलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे वाहतूक काेंडी हाेणार असल्याने रॅली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news