MD Drug Case| सिन्नर तालुक्यात अमली पदार्थांची तस्करी उघड; 3.78 ग्रॅम एमडीसह एकाला वावी पोलिसांकडून अटक!

MD Drug Case | नांदूरशिंगोटे परिसरात विनापरवाना एमडी सदृश अमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एकास वावी पोलिसांनी ताब्यात घेतले.
MD Drugs
एमडी ड्रग्स file photo
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
नांदूरशिंगोटे परिसरात विनापरवाना एमडी सदृश अमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एकास वावी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३.७८ ग्रॅम वजनाचा एमडी सदृश पदार्थ, मोबाईल, रोख रक्कम आणि मोटरसायकल असा एकूण ७० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

MD Drugs
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज; 30 हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन पूर्ण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास नाशिक-संगमनेर रोडवरील हॉटेल प्रियालजवळ, निमोण नाका, नांदूरशिंगोटे येथे ही कारवाई करण्यात आली.

प्रदीप सोपान हेरोळे (३५, रा. निंभोरा स्टेशन, ता. रावेर, जि. जळगाव, हल्ली रा. माउली लॉन्स, अंबड, नाशिक) याच्याकडून पारदर्शक झिपर प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या-पिवळसर रंगाची स्फटिक पावडर असलेला, उग्र वासाचा एमडी अर्थात मॅफेड्रोन सदृश पदार्थ आढळून आला. या पदार्थाचे पिशवीसह वजन ३.७८ ग्रॅम असून त्याची किंमत २२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MD Drugs
Murder Mystery | हॉटेल मिरचीजवळील अपघात ठरला हत्याकांड; नाशिक पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

याशिवाय ८ हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल, ८ रुपये रोख आणि ४० हजार रुपये किमतीची बजाज सीटी १०० मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात निखिल गुंजाळ (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याचे सांगण्यावरून प्रदीप हेरोळे याने अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगून मोटरसायकलवरून वाहतूक केल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.


याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सरोवर करीत आहेत. पोलिस शिपाई गणेश पवार यांनी फिर्याद दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद सरोवर, छगन चव्हाण, पोलिस हवालदार शहाजी शिंदे, राहुल निरगुडे, कैलास गोरे, किरण पवार, हेमंत फड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news