

मालेगाव (नाशिक) : तालुक्यातील भिलकोट येथे घरगुती वादातून पिता-पुत्रांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन खुनात झाले. पित्याच्या डोक्यात लाकडी दांडके घालून पुत्राने त्यांचा खून केला. पोलिसांनी संशयित मुलगा श्रीकांत पंडित निकमला अटक केली.
मुलाच्या हल्ल्यात पंडित कौतिक निकम (७०) यांचा मृत्यू झाला. मुलगा श्रीकांत व पंडित यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यातून गुरुवारी (दि. २) रात्री ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. विजयादशमीच्या मुहूर्तावरच मुलाच्या अंगात जणूकाही रावण संचारला. पोलिसपाटील चेतन निकम यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक निरीक्षक प्रीती सावंजी अधिक तपास करीत आहेत.