Malegaon Municipal Commissioner | निवृत्तीला दोन दिवस बाकी; महानगरपालिकेच्या आयुक्तांना 80 हजारांच्या लाचप्रकरणी अटक

Malegaon Municipal Commissioner | कंत्राटदारांच्या बिलांसाठी 80 हजारांची लाच मागितल्याचा आरोप
arrest
arrestFile Photo
Published on: 
Updated on: 

Malegaon Municipal Corporation Commissioner Bribe Case

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र शेखरराव जाधव यांना निवृत्तीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागण्याच्या प्रकरणात अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील तक्रारदाराने १ जुलै २०२६ रोजीच विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

arrest
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या आरोग्य संस्थांमधील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाला कडक निर्देश

त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून २९ ऑक्टोबर रोजी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आयुक्त जाधव यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक नीलेश वसंतराव पाटील आणि महानगरपालिकेचे अकाउंटंट हरीश नथुराम डिंगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या आयुक्तांवर झालेली या कारवाईमुळे मालेगावच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाई पथकात पोलिस हवालदार शरद हंडोरे, युवराज खांडवी आणि चालक पोलिस हवालदार विनोद पवार यांचा समावेश होता.

सहसापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत आणि पोलिस निरीक्षक विकास लोंढे, हवालदार संदीप हांडोरे, शिपाई किरण धुळे यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक भारत तांगडे, पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे काम पाहत आहेत. अपर पोलिस अधीक्षक प्रदीप मोरे आणि अपर पोलिस अधीक्षक कविता फडताळे,

पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. शासकीय कामांसाठी लाच मागणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

arrest
Palghar Trimbakeshwar Road: पालघर ते नाशिक प्रवास होणार जलद!दिवाळीनंतर कामाला सुरुवात

दोन बिलांसाठी लाचेची मागणी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, तक्रारदार कंत्राटदाराने मालेगाव महानगरपालिकेची दोन कामे पूर्ण केली होती. या कामांची बिल मंजूर करून संबंधित रक्कम मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. दोन्ही बिलांच्या प्रत्येकी चार टक्के प्रमाणे एकूण ८० हजार रुपयांची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त

क्रारदाराने जुलैमध्ये तक्रार दिल्यानंतर विभागाने पडताळणीची प्रक्रिया राबविली. या प्रकरणात आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहायक नीलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंगर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.