Malegaon Mayor Video: मालेगावच्या उपमहापौरांपाठोपाठ आता महापौरही वादात; टिपू सुलतानचा फोटो स्वीकारताना व्हिडिओ व्हायरल

Nasreen Sheikh viral video: महापौर नसरीन शेख अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो स्वीकारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Malegaon Mayor Nasreen Sheikh viral video:

मालेगाव : मालेगावच्या उपमहापौरांपाठोपाठ आता महापौर नसरीन शेख वादात सापडल्या आहेत. उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दलनातील टीपू सुलतानचा फोटो आज हटवला. यानंतर आता महापौर नसरीन शेख त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो स्वीकारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महानगरपालिकेत महापौर व उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने शहराच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींच्या दालनात महापुरुषांचेच छायाचित्र असावे, असा शासकीय संकेत असताना उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने शहरवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप शिवसेनेने केला. हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि फोटो न काढल्यास आम्ही तो काढू, अशा इशाऱ्यानंतर तो फोटो हटवण्यात आला होता.

आता महापौरांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना टिपू सुलतानचा फोटो भेट दिलेला आणि त्यांनी तो स्वीकारलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे मालेगावमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. या कृतीमुळे हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून महापौर अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news