Minor Girl Delivery Case | अल्पवयीन मुलीची गुप्त प्रसूती, निवृत्त वैद्यकीय अधीक्षकासह नऊ जणांना बेड्या

Minor Girl Delivery Case | मालेगावातील खळबळजनक प्रकरणाने जिल्हा हादरला
molestation
molestationfile photo
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

नाका शहरातील सटाणा परिसरातील एका खासगी रुग्णालयात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची गुप्तपणे सिझेरियन प्रसूती करून अर्भक विक्रीसाठी ठेवून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सामान्य रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने सर्वांना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

molestation
Illegal Adoption Case | अल्पवयीन मुलीची गुप्त प्रसूती, बाळाच्या परस्पर विक्रीचा संशय

या प्रकरणात एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र डोलारे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ जून रोजी अल्पवयीन मुलीची डॉ. डांगे यांच्या खासगी रुग्णालयात सिझेरियन प्रसूती करण्यात आल्याचा आरोप आहे.

पोक्सो कायद्यानुसार अशा प्रकरणांची माहिती देणे बंधनकारक असताना ती जाणीवपूर्वक दडविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात संजय गवळी, प्रवीण देशमुख, नंदिनी गवळी, डॉ. किशोर डांगे, डॉ. किशोरी डांगे, डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रीती जाधव, नवशीन शेख, मोहम्मद फईम शफिक, सार्थक जगताप तसेच अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. x

या प्रकरणात एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र डोलारे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ जून रोजी अल्पवयीन मुलीची डॉ. डांगे यांच्या खासगी रुग्णालयात सिझेरियन प्रसूती करण्यात आल्याचा आरोप आहे.

पोक्सो कायद्यानुसार अशा प्रकरणांची माहिती देणे बंधनकारक असताना ती जाणीवपूर्वक दडविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात संजय गवळी, प्रवीण देशमुख, नंदिनी गवळी, डॉ. किशोर डांगे, डॉ. किशोरी डांगे, डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रीती जाधव, नवशीन शेख, मोहम्मद फईम शफिक, सार्थक जगताप तसेच अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

molestation
Ashok Kharat case |खरात प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात, SIT कडून १०५ हून अधिक साक्षीदारांची चौकशी

प्राथमिक तपासानुसार पीडित मुलीचे वडील हयात नसून तिची आई घर सोडून गेली आहे. ती तिच्या मावशी व काकांच्या देखरेखीखाली राहत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, नवजात बालक विक्रीसाठी ठेवून घेतल्याच्या आरोपामुळे हे प्रकरण केवळ वैद्यकीय नियमभंग किंवा पोक्सोपुरते मर्यादित नसून संभाव्य बालक तस्करीच्या अनुषंगानेही तपासले जात आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक विजया पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

वैद्यकीय पथकाचे लक्ष

वैद्यकीय क्षेत्राला हादरविणाऱ्या या प्रकरणातील अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध घेतला असता ती सध्या सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी नेमकी कुणामुळे गर्भवती राहिली याबाबत माहिती देण्यास सहकार्य करत नाही. तिचे वडील हयात नसून आई घर सोडून गेल्याने ती मावशी व काकांकडे राहत होती. दरम्यान, अर्भकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news