मालेगाव : योजनांच्या माध्यमातून देणार कृषी विकासाला चालना - दादा भुसे

दादा भुसे; जिल्हास्तरीय डाळिंब व कांदा पीक परिसंवाद
डाळिंब व कांदा पीक परिसंवाद
मालेगाव जिल्हास्तरीय डाळिंब व कांदा पीक परिसंवादप्रसंगी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ड्रोनची पाहणी करताना पालकमंत्री दादा भुसे. (छाया: नीलेश शिंपी)
Published on
Updated on

मालेगाव : राज्यात फलोत्पादन क्षेत्र व उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी विविध प्रकल्प व योजना राबविण्यात येत आहेत. या प्रकल्प व योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून कृषी व्यवसायाला चालना देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. येथील बालाजी लॉन्स येथे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभाग व आत्मा, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय डाळिंब व कांदा पीक परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (To promote agribusiness by comprehensive development of horticulture sector for farmers)

नाशिक विभागीय कृषी सहसंचालक रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव आमले, आत्माचे प्रकल्प संचालक सुनील वानखेडे, प्राचार्य सचिन नांदगुडे, बाबासाहेब गोरे, अनिल निकम, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे, तहसीलदार विशाल सोनवणे, आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून नार पार योजनेला नुकतीच प्रशासकीय मान्यता तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे उपस्थित होते.

डाळिंब व कांदासारख्या पिकांमुळे शेतकऱ्यांची प्रगती होत असली, तरी डाळिंबावरील तेलकट डाग, करपा, फुलगळ यांसारख्या विविध रोगांमुळे हे पीक अडचणीत येते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून ना. भुसे म्हणाले, पश्चिम वाहिनी पूर्व वाहिनी केले, तर गिरणा, तापी खाऱ्याला उपलब्ध होऊ शकते. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला मिळाली आहे. त्या अनुषंगाने या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा व मालेगाव तालुक्यांतील ३२ हजार ४९२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील गिरणा उजवा व डावा कालव्याची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. गोरे, चलवदे, आमले यांनी मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे यांनी प्रास्ताविक केले, तर तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी आभार मानले.

पूर्व संमतिपत्र वाटप

ऑनलाइन महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी राज्यस्तर लॉटरीद्वारे निवड झालेल्या तुकाराम सूर्यवंशी, सुनील पवार, गंगूबाई अहिरे, राजेंद्र गेंद, ललित पगार, दत्तात्रय निकम, रवींद्र पवार, लक्ष्मण पवार, राकेश इंगळे, सुनंदाबाई महाले, भास्कर इझगडे, अशोक आहेर व अमृत भामरे या शेतकऱ्यांना फुंडकर फळबाग लागवड व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात पूर्व संमतिपत्र व मंजुरीपत्र वाटप करण्यात आले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news