

मालेगाव : जन्म दाखले प्रकरणात छावणी पोलिसांनी शनिवारी (दि.15) आणखी एका संशयित एजंटला अटक केली. त्याला शनिवारी (दि. 15) न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने मंगळवार (दि. 17) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित भगीरथ चौधरी असे त्याचे नावे आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आठ जणांना अटक केली असून एक जण फरार आहे.