Malegaon Accident | वडिलांच्या अंत्यविधीला जाताना अपघात ; दोन मुलींसह जावई ठार

कारची कंटेनरला धडक, एक गंभीर जखमी
Malegaon Accident
वडिलांच्या अंत्यविधीला जाताना अपघात ; दोन मुलींसह जावई ठारPudhari photo

मालेगाव : मुंबईहून वडीलांच्या अंत्यविधीसाठी मालेगावी येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावर वाके शिवारात उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात दोघी सख्ख्या बहिणी व जावयाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना घडली आहे.

गुरूवारी (दि.11) पहाटे हा भीषण अपघात घडला. या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाके शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर (एमपी 09 एचआर 8322) ला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिनाक्षी अरुण हिरे(वय 53) रा. टिटवाळा जिल्हा ठाणे, अनिशा विकास सावंत (वय 40) रा. राहुरी जिल्हा ठाणे , विकास चिंतामण सावंत (वय 45) रा. ठाकुर्ली जिल्हा ठाणे या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर वैभवी प्रविण जाधव(वय 17) रा. नाशिक ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघाताची माहिती तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news