Prison Department Posts | राज्यातील कारागृह विभागाच्या 6,109 नवीन पदांना शासनाची मंजुरी; अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग सुकर

Prison Department Posts | अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर
Prison Department Posts
Prison Department PostsFile Photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील कारागृह व सुधारसेवा विभागाच्या प्रशासकीय रचनेत बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सुधारित आकृतिबंधांतर्गत ३४ संवर्गातील ६,१०९ पदांना शासनाने मंजुरी दिली. त्याचबरोबर कालबाह्य ठरलेली ५२ संवर्गातील १५८ पदे रद्द करण्यात आली आहेत. आठ संवर्गाच्या पदनामांत बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Prison Department Posts
Sambhajinagar Accident | नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रक - दुचाकीची धडक; केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानासह तरूण जागीच ठार

गृह विभागाने सोमवारी (दि. १२) यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनाला नवी दिशा मिळणार आहे. कारागृह व सुधारसेवा विभागाच्या आस्थापनेवर यापूर्वी ८८ संवर्ग आणि ७,०६७ पदे निर्माण करण्यात आली होती. बदलत्या प्रशासकीय गरजा, कामकाजाचे स्वरूप आणि पदांची आवश्यकता लक्षात घेता सुधारित आकृतिबंध तयार करण्याची गरज होती.

त्यानुसार उच्चस्तरीय सचिव समितीच्या ३० जूनला झालेल्या बैठकीत सुधारित आकृतिबंधाला मान्यता दिली. यानुसार विभागातील कार्यकारी, प्रशासकीय आणि प्रतिनियुक्तीच्या संवर्गांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पदनामातील विसंगती दूर करणे, अन्य विभागातील पदनामांशी सुसंगत आणणे, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे.

सुधारित आकृतिबंध:

  • गट संवर्ग मंजूर पदे

  • गट अ - १२ - १५२

  • गट ब (राजपत्रित) ४ - ७२

  • गट ब (अराजपत्रित) ४ - ४९

  • गट क १४ - ५,८३६

  • एकूण - ३४ - ६१०९

'वैद्यकीय'ची 76 पदे रद्द:
कारागृह विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी श्रेणी - २ मधील २८ आणि वैद्यकीय अधिकारी श्रेणी - ३ मधील ४८ अशी ७६ पदे असलेले दोन संवर्ग रद्द करण्यात आले आहेत. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदसंख्या कमी करण्यात आलेली नाही. संबंधित ७६ पदांचे वैद्यकीय अधिकारी श्रेणी - १ या संवर्गात रूपांतर करण्यात आले असून, या पदांची संख्या पूर्वीप्रमाणेच कायम ठेवली आहे.

Prison Department Posts
Sambhajinagar Accident | नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रक - दुचाकीची धडक; केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानासह तरूण जागीच ठार

मूळ संर्गाानुसार वेतन:

प्रतिनियुक्तीद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांवर नियुक्त होणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ संर्गातील वेतनश्रेणीनुसार वेतन लाभ मिळेल. विभागातील ५२ संवर्गातील १५८ पदे रद्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संबंधित संवर्गातील सध्या भरलेली पदे कार्यरत अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, स्वैच्छनिवृत्ती, राजीनामा अथवा अन्य कारणांनी रिक्त झाल्यानंतर रद्द होणार आहेत. सुधारित आकृतिबंधामुळे कारागृह विभागातील पदांची रचना अधिक सुसंगत होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news