Maharashtra Day | महाराष्ट्र दिनी वाहत्या पाण्यात उड्या मारीत आंदोलन; काय घडलं ?

1 मे महाराष्ट्र दिनी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले
ईगतपुरी (नाशिक)
मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईला जाणारे पाणी बंद करण्यात यावे या मागणीसाठी वाहत्या पाण्यात उड्या मारीत आंदोलन करतांना कार्यकर्ते व महिला.(छाया : वाल्मिक गवांदे)
Published on
Updated on

ईगतपुरी (नाशिक) : इगतपुरी - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन योजनेचे कामे फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांच्या आर्थिक फायद्यासाठीच आहे का असा सवाल उपस्थित करुन 1 मे महाराष्ट्र दिनी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी रोखणार असा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी दिला होता. एल्गार कष्टकरी संघटनेने देऊन 1 मे रोजी आंदोलन करत पाणी रोखले.

Summary

वैतरणा धरणावर एल्गार कष्टकरी संघटनेने जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली योजनेची चौकशी करण्यासाठी व वाडयापाड्यावर टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आक्रमक होत आंदोलनात्मक पवित्रा घेत मुंबईला जाणारे पाणी रोखण्यासाठी आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. वैतरणा धरणावर 1 मे रोजी एक आक्रमक आणि थरारक आंदोलन घडून आलं आहे. मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि महिलांनी धरण परिसरात जोरदार आंदोलन छेडले.

आंदोलनाकर्त्यांमुळे थांबवला पाणीपुरवठा

या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेलं हे आंदोलन अचानक तीव्र झालं, जेव्हा संघटनेच्या महिला आणि कार्यकर्त्यांनी थेट वैतरणा धरणाच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅनलमध्ये उड्या मारल्या. हा धक्कादायक प्रकार घडताच प्रशासनालाही भान आलं आणि जलसंपदा विभाग व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी तत्काळ कॅनलमधून मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. संघटनेचा आरोप आहे की, आदिवासी पाड्यांना अजूनही शुद्ध आणि पुरेसं पाणी मिळत नाही. वारंवार निवेदने देऊनही स्थानिक जलसमस्या तसेच जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये अपारदर्शकता आणि दिरंगाई असल्याची तक्रार संघटनेने केली. यावेळी उपस्थित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सुरु असलेल्या सर्व योजनांची चौकशी केली जाईल असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले.

महिलादिनी जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा

केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेली, एक चांगली योजना जलजीवन योजना सध्या राज्यात सर्वच ठिकाणी या योजनेतून कामे सुरू आहे. मात्र ते कामे कासव गतीने सुरू आहेत. जे कामे शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाला सन- 2024 पर्यंत "हर घर नल से जल" प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येईल असे अपेक्षित होते. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक, पेठ, सुरगाणा व इतर तालुक्यातील अनेक कामे अपूर्ण आहेत. अशा सर्व कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी एल्गार संघटनेने 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता.

डॉ. आंबेडकर जयंतीदिनी मंत्रालयावर हंडा मोर्चा

14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंत्रालयावर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी कार्यकर्त्यांना इगतपुरी रेल्वे स्थानकावर थांबवून लेखी आश्वासन देऊन त्यानुसार 15 एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक झाली. मात्र त्यावेळी झालेल्या निर्णयाची आणि संघटनेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही आणि दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून 1 मे रोजी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी बंद करून आंदोलन करण्यात आले अशी माहिती यावेळी एल्गार संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली.

या आंदोलनात संतू ठोंबरे, तानाजी कुंदे, वसंत इरते, सुरेखा मधे, मंगल खडके, मथुरा भगत, मीना लोणे, काळू निरगुडे, तुषार देहाडे, समाधान सदगिर, ढवळू गोहिरे, राजेंद्र आव्हाटे, संदीप झुगरे, गणेश गोहिरे, संतू पादिर, हनुमंत सराई, कविता पुंजारे, संजय पारधी, हनुमंत वारे, शिवाजी दोरे, रामदास सावंत, शांताराम बेंडकोळी, काळू बेंडकोळी, कृष्णा वारे, पदू गांगड, बाळू गांगड, मनोज दिवे, भीमाबाई बांगारे, धोंडाबाई लोते, पिंटू गांगड, नामदेव लचके, नामदेव पारधी, सोमनाथ अव्हाटे, दत्तू बांगारे, सुभाष मधे, गंगुबाई शिद, विलास शिद, लक्ष्मण बांगारे, भागा आगीवले, यमुना लचके आदी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news