Dog Fights Leopard | मालकासाठी बिबट्याशी झुंज देणाऱ्या लाडक्या 'पिल्लू' शवानाचा अंत; नगरसूलच्या वन्हे परिवाराकडून दशक्रिया विधि संपन्न

Dog Fights Leopard | नगरसूलच्या वन्हे परिवाराकडून मुक्या जीवाचा दशक्रिया विधि
Dog Fights Leopard
Dog Fights Leopard Pudhari
Published on: 
Updated on: 

येवला : पुढारी वृत्तसेवा
कुटुंबातील सदस्यासारखा सांभाळलेल्या अन् संकटकाळी प्राणांची बाजी लावून मालकाचा जीव वाचवणारा, तसेच गेल्या १३-१४ वर्षांपासून सावलीसारखा सोबत राहणाऱ्या लाडक्या शवानाचा बिबट्याशी झुंज देताना मृत्यू झाला. 'पिल्लू' असे नाव असलेल्या या शवानाचा नगरसूल येथील मेंढपाळ वन्हे परिवाराने नुकताच दशक्रिया विधि केला.

Dog Fights Leopard
Nashik Groundwater Level | नाशिक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट; येवला तालुक्यात तीन मीटरपेक्षा अधिक पाणीपातळी खाली

मेंढपाळ श्रावण आसाराम वन्हे यांचा परिवार नेहमी मेंढ्यांच्या संगोपनासाठी रानावनात मुक्कामास असतो. शुक्रवारी (दि. १६) त्यांचा कळप कोपरगाव - टाकळी शिवारात मुक्कामी होता. चोहोबाजूनी उसाने वेढलेल्या शेतात सुमारे दोनशे मेंढ्या, एक गाय आणि वन्हे परिवारातील सदस्य वास्तव्यास होते.

मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कळपावर हल्ल्याचा प्रयत्न केला. बिबट्याची चाहूल लागताच, गेल्या अनेक वर्षांपासून परिवाराची राखण करणारा लाडका कुत्ता 'पिल्लू' कोणतीही भीती न बाळगता जोराजोरात भुंकत थेट बिबट्याच्या अंगावर धावला.

Dog Fights Leopard
Nashik Accident Death | येवला उपजिल्हा रुग्णालयासमोर भीषण अपघात; भरधाव डम्परच्या धडकेत कोपरगावच्या दोघांचा जागीच मृत्यू

मालकाचे कुटुंब आणि मेंढ्यांच्या रक्षणाइसाठी त्याने जिवाची बाजी लावत बिबट्याशी लढा दिला. मात्र बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी वन्हे परिवाराने परिसरात शोधाशोध केली असता पिल्लूचा मृतदेह सापडला नाही. संकटाच्या काळात धावून जाणारा आपला खरा साथीदार कायमचा हरवल्याने संपूर्ण वन्हे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मुलासारखा सांभाळ

गेल्या १३ ते १४ वर्षांपासून वन्हे कुटुंबाचा तो एक अविभाज्य घटक बनला होता. कोणीही सदस्य दुचाकीवरून बाहेर पडला, की पिल्लू एखाद्या लहान मुलाप्रमाणे हट्ट धरून मागे धावत सुतायचा आणि दुचाकीवर बसून सोबत जायचा. रानावनातील रोजच्या भटकंतीत तो सावलीसारखा कुटुंबासोबत असायचा, त्याच्याया बालिश व लाडक्या सवयी आणि आठवणींमुळे परिवार अक्षरशः सुन्न झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news