

नाशिक : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्यावतीने २८ एप्रिल रोजी एलएलबी पाच वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होणार आहे. उमेदवारांना सीईटी सेलच्या cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. एलएलबी पाच वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन घेतली होणार आहे. उमेदवारांकडे प्रवेश केंद्रावर जाताना प्रवेशपत्राची छापील प्रत असणे आवश्यक आहे. तसेच ओळखीच्या पुराव्यासाठी वैध फोटो असलेले ओळखपत्र असणे गरजेचे आहे.