कणकापूरात बिबट्याचा गायीवर हल्ला

पशु पालकांमध्ये घबराटीचे वातावरण

Leopard attacks cow in Kankapur
कणकापूरात बिबट्याचा गायीवर हल्ला FILE
Published on
Updated on

देवळा ; तालुक्यातील कणकापूर येथे सोमवारी दि. १७ रोजी रात्री बिबट्याने गायीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली आहे. याठिकाणी बिबट्याच्या दहशतीने पशु पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पश्चिम भागातील कणकापूर,खर्डे,वडाळा,शेरी व वार्षि या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. सोमवारी दि. १७ रोजी रात्रीच्या सुमारास कणकापूर कांचने रस्त्यावर शेतकरी पोपट भवरे यांच्या मळ्यात असलेल्या जनावरांपैकी एका गायीवर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार शेतकरी भवरे यांच्या सकाळी उठल्यावर लक्षात येताच त्यांनी सदरच्या घटनेची माहिती वनविभागाला कळवली. घटनास्थळी वनपाल डी. पी गवळी यांनी भेट दिली व जखमी जनावरावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला दिला.

खर्डे व परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून, त्याच बरोबर गहू, मका आदी पिके पण उभी आहेत. हा सर्व परिसर डोंगराळ भागात असल्याने याठिकाणी बिबट्यांचे दर्शन नित्याचेच झाले आहे. यामुळे शेत शिवारात राहणाऱ्या पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news