

नाशिक रोड : वडनेर दुमाला गावात शुक्रवारी (दि. ८ ऑगस्ट) रात्री सुमारे आठ वाजता चार वर्षीय आयुष किरण भगत या बालकावर बिबट्याने हल्ला केला. घटनेनंतर बालकाचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांसह वनविभागाचे पथक तातडीने शोध मोहीम राबवत आहे.
अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले असून, ग्रामस्थांनी बिबट्याच्या वाढत्या वावरावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. अद्यापपर्यंत बालकाचा शोध लागला नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. परिसरात बिबट्याचा अधिवासामुळे नागरिकांना परिसरात वावरण कठीण झाले असून लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यात यावे अशी मागणी होत आहे.