Nashik : 'एसएमबीटी'त सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन

SMBT: हृदयविकारासह कॅन्सर, मूत्रविकारावर मोफत शस्त्रक्रिया
SMBT
नाशिक : आराग्यसाधना शिबिर उ‌द्घाटनप्रसंगा डा. सुधार ताब व मान्यवर.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत या हेतूने सुरू करण्यात आलेल्या आरोग्यसाधना शिबिरास सुरुवात झाली आहे. माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सदर शिबिर महाराष्ट्रातील सर्वात मोठे आरोग्य शिबिर असून, सलग तीन महिने रुग्णांवर मोफत व अल्प दरांत उपचार केले जाणार आहेत.

सिन्नर-घोटी रस्त्यावर असलेल्या 'एसएमबीटी हॉस्पिटल'मध्ये विविध आरोग्य उपचार मोफत केले जात आहेत. महाराष्ट्रातील सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरविणारे हॉस्पिटल म्हणून 'एसएमबीटी'चा लौकिक आहे. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य साधना आरोग्य शिबिरात तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले.

मोफत शस्रक्रिया सोबतच शासकीय योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रिया अल्प दरात

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये यंदा कर्करोग, मेंदूसंबंधित आजार, मणकेविकार, पोटविकार, दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, मूत्ररोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, जनरल सर्जरी यासोबतच हृदयविकारांवर मोफत शस्रक्रिया केल्या जात आहेत. ९१० हजार बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये शेकडो अनुभवी डॉक्टर्स पूर्ण वेळ सेवा बजावत आहेत. शिवाय प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ओपीडी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले १७ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, 24 तास उपलब्ध असणारा अतिदक्षता अपघात विभाग आहे. शिबिराच्या कालावधीत औषधे, रक्त-लघवी तपासणी, एक्स-रे-सोनोग्राफी तसेच इतर ज्या शस्रक्रिया शासकीय योजनेत बसत नाहीत अशा सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया अल्प दरात होणार आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन केले जाते आहे. सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार तेही मोफत तसेच परवडणाऱ्या दरांत उपलब्ध व्हावेत हा हेतू या माध्यमातून साकार होताना आनंद होत आहे.

डॉ. सुधीर तांबे, माजी विधान परिषद सदस्य

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news