Lasalgaon | लासलगाव सरपंचपदी योगिता पाटील

सत्तारूढ गटातील लढत चर्चेत; विरोधी गटाचे तिघे उमेदवार फुटले
lasalgaon sarpanch yogita patil
सरपंच पदी योगिता पाटील यांची निवड होताच उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी सत्कार केला. Pudhari
Published on
Updated on

लासलगाव : लासलगाव ग्रामपंचायतीतील चमत्कारित राजकीय घडामोडींची मालिका सरपंच निवडणुकीतही पहायला मिळाली. सरपंचपदाच्या स्पर्धेतून एेनवेळी विरोधी गटाच्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यानंतरही सत्ताधारी गटातच लढत झाली.

लासलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाची माळ योगिता योगेश पाटील यांच्या गळ्यात पडली त्यांना 10 मते मिळाली तर पराभूत उमेदवार रोहित पाटील यांना केवळ 6 मते मिळाली. या निवडणुकीत विरोधी गटाच्या अश्विनी बर्डे या गैरहजर होत्या.

गुरुवारी दुपारी ग्रामपंचायतीच कार्यालयात झालेल्या निवडणूक प्रक्रियेत चंद्रशेखर होळकर, रोहित पाटील, रेवती होळकर, डॉ. सायली पाटील व योगिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माघारीनंतर विरोधी गटाचे चंद्रशेखर होळकर व सत्ताधारी गटाचे रेवती होळकर, डॉ. सायली पाटील यांनी माघार घेतल्याने सत्ताधारी गटाचे योगिता पाटील व रोहित पाटील यांच्यात सरपंच पदासाठी गुप्त पद्धतीने निवडणूक झाली.

त्यात सत्ताधारी गटाच्या योगिता पाटील यांना दहा मते तर रोहित पाटील यांना सहा मते मिळाली विरोधी गटाचे तीन उमेदवार सत्तारूढ गटाला मिळाल्याने योगिता पाटील यांची निवड सोपी झाली. या वेळी विरोधी गटाच्या अश्विनी बर्डे या गैरहजर होत्या.

सरपंच पदाच्या पदासाठी योगिता पाटील यांना सूचक म्हणून पुष्पा अहिरे तर रोहित पाटील यांना सूचक म्हणून जयदत्त होळकर होते. गुप्त पद्धतीने मतदान झाल्यानंतर मतमोजणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी सर्कल भाऊसाहेब देवकाते, तलाठी नितीन केदार यांनी योगिता पाटील सरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले.

सकाळी सत्ताधारी गटाच्या चार सदस्यांनी सरपंच पदासाठी फॉर्म भरल्यानंतर निवडणुकीत रंगतदारपणा येईल असे वाटत असताना सत्ताधारी गटाच्या उमेदवारांमध्ये सरपंच पदाची लढत झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बघावयास मिळाला.

सरपंचपदी योगिता पाटील यांची निवड होताच होळकर पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला.

सरपंच पदी निवड होताच योगिता पाटील यांनी आपले सासरे कै. एडवोकेट शंकरराव पाटील यांची सरपंच पदाचे स्वप्न माझ्या रूपाने पूर्ण झाल्याने आम्ही समाधानी आहोत.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, चंद्रशेखर होळकर, अमोल थोरे, संतोष पलोड, रामनाथ शेजवळ, अफजल शेख ,रोहित पाटील, ज्योती निकम, सुवर्णाताई जगताप, संगीता पाटील, अमिता ब्रम्हेचा, पुष्पा अहिरे, डॉ. सायली पाटील, रेवती होळकर, यांच्यासह ग्रामविकास अधिकारी जंगम, गुणवंत होळकर डॉ. विकास चांदर , शंतनू पाटील,अक्षय ब्रम्हेचा ,वीशालपालवे ,भैया नाईक, मयूर बोरा ,संजय पाटील, वेदिका होळकर,

संतोष ब्रम्हेचा, हरी होळकर, मिरान पटेल, गोकुळ पाटील, ललित दरेकर, विपिन ब्रम्हेच्या, दिनेश जाधव, डॉ. कैलास पाटील, देविदास पाटील , उमेश पाटील, प्रमोद पाटील,प्रकाश गांगुर्डे यांच्यासह होळकर पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news