

नाशिक : लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत नाशिककरांनी यंदा सोने-चांदी, नवीन वाहने, घरे, कपडे तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची यथेच्छ खरेदी केली. लक्ष्मीपूजन मुहूर्तावर जिल्ह्यात विविध क्षेत्रांत मिळून ८०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी दिवाळीच्या काळात सुमारे ७०० कोटी रुपयांची उत्लाढाल झाली होती. त्या तुलनेत यंदा त्यात १०० कोटींची वाढ झाल्याचा अंदाज आहे.
दिवाळीच्या पहिल्या आठवड्यापासूनच बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून येत होता. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मात्र या उत्साहाने उच्चांक गाठला, सराफ बाजारात सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. वाहनांच्या शोरूममध्ये नवीन वाहनांची सुपूर्दगी घेण्यासाठी ग्राहकांनी कुटुंबीयांसह हजेरी लावली. बांधकाम क्षेत्रातही गृहप्रवेश आणि नवीन घरांच्या ताब्याला प्राधान्य देण्यात आले. कपडे, विद्युत उपकरणे, घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, सजावटीचे साहित्य आणि पूजा साहित्याच्या खरेदीने बाजारपेठेला मोठी झालाली मिळाली.
कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स खरेदीला पसंती दिवाळी म्हटली की, नवीन कपड्यांची खरेदी आलीच. मुख्य बाजारपेठेतील मेन रोड, शालिमार, रविवार कारंजा यांच्यासह शहरातील विविध वादालनांमध्ये सहकुटुंब खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. लहान मुलांचे कपडे, महिलांचे पारंपरिक पोशाख, साङघा, कुर्ते आणि रेडिमेड कपड्यांना मोठी मागणी होती. मागील वर्षी दिवाळीच्या काळात कपडे खरेदीतून सुमारे १७० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. दुसरीकडे टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन्स, संगणक तसेच अन्य घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीलाही ग्राहकांनी पसंती दिल्ली, नवीन घरासाठी आवश्यक उपकरणे एकाच वेळी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. याशिवाय विद्युत रोषणाई, आकर्षक पणत्या, आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू आणि पूजासाहित्याच्या खरेदीतूनही मोठी उलाढाल झाली
सोने - चांदीत ३०० कोटी उलाढालीचा अंदाज गेल्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या दात झालेल्या चढ - उत्तारांमुळे ग्राहकांनी खरेदीसाठी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला. पारंपारिक दागिन्यांसह सोन्याची नाणी, लगड आणि चांदीच्या वस्तूंना मागणी होती. लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. यंदा सोने चांदीच्या व्यवहारांतून सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज सराफ व्यावसाविकांनी व्यक्त केला आहे.
वाहन बाजारात २५० कोटींची उलाढाल नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण जवळपास एकाच कालावधीत आल्यामुळे वाहन बाजाराला मोठी चालना मिळाली. अनेक ग्राहकांनी दिवाळीपूर्वीच वाहन बुकिंग केले होते. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सुपूर्दगी घेण्यासाठी शोरूममध्ये गर्दी झाली होती. यंदा जिल्ह्यात सुमारे १,२०० चारचाकी आणि ३,००० ट्वाकी वाहनांची विक्री होण्याचा अंदाज आहे, यामध्ये सुमारे १,६०० इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश अपेक्षित आहे. वाहन विक्रीतून सुमारे २५० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वाहन क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे
लक्ष्मीपुजनांचा मुहूर्त साधत नवीन घर खरेदी आणि गृहप्रवेश करण्याची अनेकांनी संधी साधली. शहरासह जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांमध्ये ग्राहकांची वर्दळ होती. सुमारे ७०० हून अधिक फ्लॅट, रो हाउस, प्लॉटचे व्यवहार, नवीन घरांचे आरक्षण आणि गृहप्रवेश वामुळे बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, याशिवाय भूखंड, व्यावसायिक गाले आणि कार्यालयीन आगांच्या खरेदी विक्रीलाही प्रतिसाद मिळाला. गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये वाढलेल्या गृहबाजाराचा सकारात्मक परिणाम यंदाच्या दिवाळीत दिसून आला.
सुख - समृद्धीसाठी घरोघरी आराधना घरे, आस्थापनांमध्ये भक्तिमय वातावरण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दीपोत्सव पर्चातील महत्त्वाच्या लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी (दि. ८) घरोघरी उत्साह आणि भक्तिमय वातावरण बघावयास मिळाले. घघरांसह विविध व्यावसायिक आस्थापना, दुकाने आणि कार्यालयांमध्येही विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा करून कुटुंबीयांनी पूजेत सहभाग घेतला, लक्ष्मीमातेकडे सुख, समृद्धी, भरभराट आणि आर्थिक सुबत्तेची मागणी करीत नागरिकांनी दीपोत्सव साजरा केला.
लक्ष्मीपूजनासाठी सकाळपासूनच घराघरांत तयारी सुरू होती. घरांची स्वच्छता, आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट, पणत्यांची आरास आणि विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. सायंकाळी मुहूर्तावर गणपती, लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन करण्यात आले. पूजेच्या ठिकाणी धान्याची रास, नाणी, दागिने, नवीन वस्तु, लाह्या बतासे, फळे आणि मिठाई ठेवून पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करण्यात आली. बंदा लक्ष्मीपूजनाचा मुख्य शुभ मुहूर्त सायंकाळी ६ वाजून २२ मिनिटांपासून रात्री ८ वाजून २२ मिनिटांपर्यंत होता. या मुहूर्तावर अनेक कुटुंबांनी एकत्र येत लक्ष्मीपूजन आणि आरती केली. महिला, पुरुष तसेच लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजेत सहभाग घेतला. नवीन कपडे परिधान करून पूजेसाठी एकत्र आलेल्या कुटुंबीयांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. वर्षभर कुटुंबात सुख-शांती नांदावी, व्यवसायात भरभराट व्हावी, आर्थिक अडचणी दूर होऊन समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना लक्ष्मीमातेकडे करण्यात आली.
मनपा मुख्यालयात लक्ष्मीपूजन
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडणे आणि त्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास घडवणे हीच आपल्या सर्वांसाठी खरी दिवाळी ठरेल, असा निर्धार नाशिक महानगरपालिकेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. महापालिका मुख्यालयातील खजिना विभागात वित्त व लेखा विभागाच्यावतीने रविवारी (दि. ८) आयोजित पारंपरिक लक्ष्मीपूजन सोहळ्यात मान्यवरांनी शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सिंहस्थ नियोजनाचा संकल्प मांडला.
घरांप्रमाणेच व्यापारी आणि व्यावसायिक आस्थापनांमध्येही लक्ष्मीपूजनाची लगबग होती. दुकाने, कार्यालये आणि विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजनासह हिशेबाच्या नवीन वह्यांचे पूजन केले, व्यवसायात प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि वर्षभर चांगली उलाढाल व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. अनेक ठिकाणी कर्मचारी आणि व्यावसायिकांनी एकत्रितपणे पूजेत सहभाग घेतला.
डिजिटल साधनांचे पूजन
व्यापारी वर्गात चोपड़ी पूजनाला विशेष महत्त्व असून, बदलत्या काळानुसार आता वही खात्यांबरोबर लॅपटॉप, संगणक आणि डिजिटल व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचेही पूजन करण्यात आले, घरातील सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करीत दिव्यांच्या प्रकाशात लक्ष्मीचे स्वागत केले. परंपरेसोबत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकडेही अनेकांनी संकल्प केला.
महापालिकेच्या खजिना विभागात मंत्रोच्चार व शंखनादाच्या मंगल स्वरात विधिवत लक्ष्मीपूजन झाले, महापौर हिमगौरी आहेर-आडके व अभिजित आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप व तेजश्री सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, तसेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा या मान्यवर दाम्पत्यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली, याप्रसंगी शिक्षण सभापती प्रा. शरद मोरे, महिला व बालकल्याण सभापती कोमल मेहोलिया, पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुंभमेळा शहराला वेगळ्या उंचीवर नेणारा ठरणार असून, तो क्षण आपल्या सर्वांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी - दसरा असेल, कुंभमेळा यशस्वीतेसाठी व शहराच्या शाश्वत विकासासाठी मनपा प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे असे सांगत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिवाळीच्या शुभेचा दिल्या.
शहराच्या विकासावर भर : आयुक्त मनीषा खत्री
नाशिकच्या पायाभूत सुविधा व नागरी विकासावर विशेष भर दिला जात आहे असे मनीषा खत्री यांनी सांगितले तसेच स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी ही दिवाळी सर्व नाशिककरांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशा सदिच्छा दिल्या.