Laxmi Tathe Arrested | गांजा तस्करी प्रकरणी लक्ष्मी ताठेंना अटक

तेलंगणा पोलिसांची नाशिकमध्ये कारवाई
ganja smuggling, Laxmi Tathe Arrested
गांजा तस्करी प्रकरणी नाशिकच्या लक्ष्मी ताठेंना तेलंगणा पोलिसांकडून अटक file photo

नाशिक : तेलंगणा राज्यात १९० किलो गांजा तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांनी पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे तेलंगणा पोलिसांनी नाशिक शहरातून लक्ष्मी ताठे या महिलेस पकडले आहे. पंचवटी पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी ताठे हिस अटक केली आहे. संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित लक्ष्मी ताठे हिने गांजा खरेदी करुन वाहतूक करण्यास सांगितले होते.

तेलंगना राज्यातील वारंगल जिल्ह्यातील धामेरा पोलिस ठाण्यात गांजा तस्करी केल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. या संशयितांनी पोलिस चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, संशयित लक्ष्मी ताठे हिचा सहभाग उघड झाला. त्यावरुन तेलंगणातील न्यायालयाने ताठे हिच्याविरोधात अटक वॉरंट काढले. त्यानुसार बुधवारी (दि. १०) दुपारी धामेरा पोलिस नाशिक शहरात दाखल झाले होते. त्यांनी पंचवटी पोलिसांच्या मदतीने ताठे हिचा ताबा घेतला.

२०१८ मध्येही केली होती अटक

दरम्यान, सन २०१८ मध्ये नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा तस्करीत ताठे हिला अटक केली होती. तिने ओडिशा राज्यातून सहाशे 80 किलो गांजा तस्करी केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात ताठेसह सिन्नर, जळगाव जिल्ह्यातील संशयितांनाही बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान, ताठे या गत वर्षापर्यंत शिवसेना शिंदे गटात सक्रीय होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news