

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कुशावर्ताप्रमाणे निर्मिती करण्यात येणारे पाच कुंड, मंदीराभोवतीची विकासकामे, इतर मंदिरांचे व्यवस्थापन, दर्शनमार्ग तसेच पार्किंगव्यवस्थेबाबत नव्याने आराखडा सादर करावा अशा सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी जिल्हा प्रशासनाकडून 1800 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यास त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत विकास आराखडा नाव देण्यात आले आहे. या विकास आराखड्यामुळे त्र्यंबकेश्वरचा संपूर्णत: कायापालट होणार आहे. गुरुवारी (दि.24) राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या त्र्यंबकच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्र्यंबकेश्वरमधील मुख्य मंदिराभोवतीची विकासकामे, भाविकांच्या स्नानासाठी त्र्यंबकमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात येणार असलेली विविध कुंडे, गर्दीचे व्यवस्थापन, इतर मंदिरांची विकासकामे आणि व्यवस्थापन, दर्शनमार्ग तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये येणार्या भाविकांच्या वाहनांसाठी उभारण्यात येणार्या पार्किंग व्यवस्थेचा आराखडा सादर करण्यात आला. यावेळी मुख्य सचिवांनी त्र्यंबकच्या विकास आराख÷ड्यात काही बदल सुचवित नव्याने विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे बदल करून पुन्हा नव्याने आराखडा सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर शाहीमार्गावरील शासनाकडून मंजूर करण्यात आलेला नियोजित घनकचरा प्रकल्प हटवा या मागणीचे निवेदन श्री पंच दशनाम जुना आखाड्यातर्फे हरीगिरी महाराज यांच्या आदेशाने नीलकंठगिरी महाराज, शिवानंद पुरी महाराज यांनी गुरुवारी (दि.24) जिल्हाधिकार्यांना दिले. त्र्यंबकेश्वरसाठी शासनाकडून त्र्यंबकेश्वर शाहीमार्गावील श्री पंचदशनाम जुना आखाडा-कुंभ छावणी - पिंपळद या रस्त्यावर घनकचरा प्रकल्प उभारण्यात येत आहे. शाहीमार्गावर हा प्रकल्प झाल्यास साधू-संतांसाठी हा प्रकल्प डोकेदुखी ठरणार आहे. कचरा आणि दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ शकते. यामुळे त्र्यंबकेश्वरच्या माहात्म्यावर आघात होऊ शकतो. तत्राभ, त्र्यंबक नगरपालिकेच्या मालकीच्या कोजुळी येथील गट नं. 49 वर हा कचरा प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी यावेळी श्री पंचदशनाम आखाड्यातर्फे करण्यात आली आहे.