Trimbakeshwar Infrastructure Development | त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार

Trimbakeshwar Infrastructure Development | मंत्री महाजन : त्र्यंबकेश्वर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपजन सोहळा
Trimbakeshwar Jyotirling Temple
Trimbakeshwar Temple ControversyPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर निसर्गरम्य, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर विविध पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी काळात या शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे प्रतिपादन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केले.

Trimbakeshwar Jyotirling Temple
Satish Jarkiholi | भाजपकडून मुस्लिम,पाकिस्तानचा फक्त वापर : मंत्री सतीश जारकीहोळी

त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी (दि. २९) दुपारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपजन मंत्री महाजन यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. राजाभाऊ वाजे, आ. गोकुळ गिते, आ. हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे,

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सा. बां. विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी रविकांत सानप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, संपतराव सकाळे, विनायक माळेकर आदी उपस्थित होते. मंत्री महाजन म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साकारण्यात येत आहे.

Trimbakeshwar Jyotirling Temple
West Bengal Politics | पुत्रमोहाचे राजकारण

ही इमारत सर्व सुविधांयुक्त असेल. नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तालुकास्तरावरील एवढी मोठी राज्यातील तालुकास्तरावरील पहिली इमारत ठरेल. सिंहस्थासाठी राज्य शासनाकडून पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे वर्षभरात त्र्यंबकेश्वर शहराचा चेहरामोहरा बदलेला दिसेल. त्यामुळे या शहराचा जगभर नावलौकिक होईल. त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ, नवीन घाट, रस्ते तयार करण्यात येत असून, गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील, असेही नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीस तहसीलदार जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news