Nashik Cyber Police Case | कुंभमेळा प्राधिकरणाचे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Nashik Cyber Police Case | नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; सायबर पोलिसांकडून हेल्पलाईन क्रमांक जारी
 Police Constable Allegations
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on: 
Updated on: 

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत अकाऊंट असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करणारे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी संबंधित अकाऊंटधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 Police Constable Allegations
Nashik Pune Railway Project: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; आमदार सत्यजीत तांबे आक्रमक, जनसुनावणीची मागणी!

नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याच्या सायबर पेट्रोलिंग पथकाकडून सोशल मीडियावरील संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे. १५ नोव्हेंबर रोजी सायबर पेट्रोलिंग सुरू असताना इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर official.kumbhnagari_nashik या नावाने एक अकाऊंट कार्यरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या अकाऊंटची तपासणी केली असता, त्यावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कार्यक्रमांसंदर्भात रील्स आणि पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, हे अकाऊंट 'सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक' या शासकीय कार्यालयाचे अधिकृत पेज असल्याचे भासवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी कारवाई केली.

 Police Constable Allegations
Nashik Pneumonia Campaign | बालकांना न्यूमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात विशेष अभियानाला सुरुवात

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच इतर शासकीय योजना आणि कार्यक्रमांची माहिती मिळवताना नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आणि प्रमाणित (व्हेरिफाइड) सोशल मीडिया हँडलवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्याकडून करण्यात आले आहे.

बनावट किंवा संशयास्पद सोशल मीडिया अकाऊंट आढळ्यास तातडीने नाशिक शहर सायबर पोलीस ठावेशी संपर्क साधावा. यासाठी सायबर पोलिसांनी ९९२३३२३३११ हा संपर्क क्रमांक तसेच सीपी व्हॉट्सॲप क्रमांक ११२ उपलब्ध करून दिला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशलनावरील बनावट अकाऊंटपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.