

नाशिक : राज्यातील सर्वात भव्य ५० एकर परिसरातील आधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी सिन्नर येथे करणार असून, राज्यासाठी एका सर्वंकष क्रीडा धोरणाचा प्रस्ताव शासनदरबारी मांडणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
राज्याचे कृषिमंत्री म्हणून ॲड. माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शनिवारी (दि. २५) विविध क्रीडा संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील होते. कालिकादेवी मंदिर संस्था, क्रीडा संस्कृती फाउंडेशन, यशवंत व्यायामशाळा, व्हॉलिबॉल असो., तलवारबाजी असो., कॅरम, सेपक टाकरा, टेनिस व्हॉलिबॉल, जम्प रोप, नाशिक जिल्हा तालीम संघ, रोलबॉल, खेलो मास्टर्स असो., स्क्वॉश रॅकेट, एन.टी.पी.एस. स्पोर्ट्स क्लब, एकलहरे, हॉकी असो., पोलिस बॉईज क्लब, बेसबॉल असो., सॉफ्टबॉल असो., फुटबॉल असो., मुक्तांगण अशा विविध क्रीडा संघटनांतर्फे माणिककराव कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हेमंत पांडे, राहुल देशमुख, अशोक, दुधारे, ॲड. गोरखनाथ बलकवडे, राजू शिंदे, संजय होळकर, रवींद्र मोरे, रामदास होते, उदय खरे, अशपाक शेख आदी उपस्थित होते. नितीन सुगंधी यांनी परिचय करून दिला. अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक, उदय खरे यांनी सूत्रसंचालन केले.