king of fruits 'Hapus' Rate | फळांचा राजा खातोय 'भाव'

Nashik । 1400 ते 1600 रुपये डझन : ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद
Hapus
हापूस आंबाPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : फळांचा राजा 'हापूस' नाशिकच्या बाजारपेठेत दाखल झाला असला असून, खरेदीला नाशिककरांकडून प्रतिसाद दिला जात आहे.

Summary

गत वर्षीच्या तुलनेत दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या हापूसचा दर १४०० ते १६०० रुपये डझन इतका आहे. हापूसबरोबरच इतरही आंब्यांची बाजारात आवक वाढत असल्याने, दर कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे.

मार्चमध्येच हापूस दाखल

हंगामातील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेला फळांचा राजा म्हणजेच हापूस रमजान महिना संपताच बाजारात दाखल होतो. तर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केसर, बादाम व इतर आंब्यांची आवक वाढण्यास सुरुवात होते. यंदा मार्चमध्येच नाशिकच्या बाजारपेठेत हापूस दाखल झाला. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या प्रारंभी बाजारात देवगड हापूससह केसर, बादाम, लालबाग, राजापूरी, रत्नागिरी व अन्य आंबे दाखल झाले आहेत. सध्या गंगापूररोडसह, कॉलेजरोड, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल आदींसह शहराच्या अन्य भागात आंबे विक्रीची दुकाने थाटली आहेत.

बाजारात आंब्याची आवक वाढत असली तरी, हापूस अजूनही भाव घात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ३० एप्रिल रोजी अक्षयतृतीया हा सण असून, या दिवशी 'आमरस'चा बेत आखला जातो. त्यामुळे अक्षयतृतीयापर्यंत हापूसचे दर कमी हाेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या चांगल्या दर्जाच्या हापूस १४०० ते १६०० रुपये डझनप्रमाणे विकला जात आहे. गतवर्षी हा दर एक हजार ते बाराशे रुपये इतका होता. आता त्यात वाढ झाली आहे.

किरकोळ बाजारात हापूस तीनशे रुपये किलो दराने विकला जात आहे. इतर आंब्यांचे दर देखील दोनशे रुपये किलो व त्यापेक्षा अधिक आहेत. दरम्यान, गतवर्षी अवकाळी पावसाने आंबा हंगामाचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे हंगामाच्या अखेरपर्यंत दर चढे होते. तुलनेत यंदा अवकाळीचा फारसा फटका बसला नसल्याने, पुढच्या काळात नाशिकच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढण्याची शक्यता असून, दर आटोक्यात येतील असे विक्रेते सांगत आहेत.

असे आहेत दर (रुपयांत)

  • देवगड हापूस - ३०० ते ५००

  • रत्नागिरी - २५० ते ४५०

  • केशर - २५० ते ४५०

  • लालबाग - २०० ते ३००

  • बादाम २०० ते ३००

हापूस आंब्याची आवक जशी वाढेल, तशी किंमती कमी होतील. सध्या किंमती जास्त असून, अक्षयतृतीयापर्यंत किंमती आटोक्यात येतील, अशी अपेक्षा आहे. सध्या आवक वाढत आहे.

मदत निगळ, विक्रेता, सातपूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news