

नाशिक : जिल्ह्यात जून महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्या करण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सतत पाऊस सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस अवघ्या 47 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. अद्याप जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पेरण्या शिल्लक आहेत.
जिल्ह्यात सरासरी पेरणीचे क्षेत्र 6 लाख 54 हजार 870.14 हेक्टर आहे. मात्र, सध्या 3 लाख 1 हजार 132.93 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर देवळा तालुक्यात 86.66 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येवला तालुक्यात 86.13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. चांदवड तालुक्यात 78.13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर मालेगाव तालुक्यात 65.34 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बागलाण तालुक्यात 47.5 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित नऊ तालुक्यांत मात्र पेरणीचे प्रमाण नगण्य आहे.
जिल्ह्यात एकूण तृणधान्याच्या 51.16 टक्के पेरण्या झाल्या आहेत. एकूण कडधान्याच्या 46.17 टक्के पेरण्या झाल्या आहेत. एकूण गळीत धान्याच्या 30.44 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, या तीन तालुक्यांत पावसामुळे जून महिन्यात पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे ज्या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. अशा तालुक्यात पेरण्यांचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुलै महिन्यात काही काळ पावसाने विश्रांती घेतल्यास पेरण्या होऊ शकणार आहेत. मात्र सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पेरण्या करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
भात - 0.44,ज्वारी- 14.67, बाजरी-29.8, नाचणी- 021, मका-84.71, इतर तृणधान्ये- 0.1, तूर-15.61
मूग- 77.03, उडीद-5.32, इतर कडधान्ये- 1.28, भूईमूग- 26.86, तीळ-6.1, कारळे- 35.4, सूर्यफुल-2.82
सोयाबीन- 32.02, इतर गळीतधान्य-0, कापूस- 54.75, उसाचे गाळप- 0