

दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील कादवा खरेदी-विक्री संघ सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 13 जागांसाठी 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, सर्व 16 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव मोरडे यांनी दिली.
दाखल अर्जामध्ये सहकारी संस्था प्रतिनिधींच्या 4 जागांसाठी 5 अर्ज, व्यक्तिगत सभासद प्रतिनिधींच्या 3 जागांसाठी 4 अर्ज, इतर मागासवर्गीय प्रतिनिधीच्या 1 जागेसाठी 2 अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राखीव पैकी पाच जागांसाठी पाचच अर्ज प्राप्त झाल्याने त्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात प्रक्रिया संस्था प्रतिनिधी बाळकृष्ण पोपटराव जाधव, भटक्या विमुक्त प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून संतोष मनोहर कथार, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी बारकू वामन सूर्यवंशी, महिला राखीव (2 जागा) कमल काशीनाथ थोरमिसे, सरला नारायण सवंद्रे यांचा समावेश आहे.