JEE Mains Result 2025 : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; वेदांत भट्ट जिल्ह्यातून प्रथम

Nashik । 'जेईई-मेन'मध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
JEE Mains Result 2025
JEE Mains Result 2025 Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील जेईई मेन-२०२५ परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शनिवारी जाहीर केला. त्यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. नाशिक केंद्रातील वेदांत भट्ट या विद्यार्थ्याने सर्वाधिक ९९.९८९ पर्सेटाईलने (एआरआर-२२६) जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

रेजोनन्स अकॅडमीच्याच ओम गायधनी ९९.९५५, फाल्गुन राठोर ९९.८५७, आर्य दुबे ९९.८५६, हर्ष म्हस्के ९९.८१६, जगन्नाथ ९९.७९९ ,तन्मय गुप्ता ९९.७७३, ओम लसणापुरे ९९.७०१, सौरभ शिंदे ९९.६०२, आशिष रकिबे ९९.५०८, तनुज पांगारकर ९९.४२३, तेजस सूर्यवंशी ९९.४१७ ,प्रसाद वाघ ९९.४०९, पार्थ अचाट ९९.३८०, अर्णव घोटेकर ९९.२४१, श्रेयस शुक्ला ९९.२३०, आयुष बोडके ९९.०७१, सतेज कोल्हे ९९.०५१, पर्सेटाईल या १८ विदयार्थ्यांनी ९९ पर्सेटाईल पेक्षाही अधिक गूण मिळून घवघवीत यश मिळाले आहे. तसेच इतर ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ९५ पर्सेटाईलपेक्षा अधिक गूण मिळवले आहेत.

अभ्यासाचे काटोकार नियोजन केले. त्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली. सर्व विषयांचे योग्य व समावेशक मार्गदर्शन, नियमित सूक्ष्म व मोठ्या टेस्ट्स व वेळोवेळी प्रत्येक मार्गदर्शकांनी शंकांचे निरसन केल्यामुळे अभ्यासाला गती मिळाली.

वेदांत भट, विदयार्थी, नाशिक.

''प्रारंभीपासूनच यश मिळवयाचे हा पक्का निर्धार केला. क्लासेसमधून अभ्याक्रम व मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, अभ्यासासाठी संपूर्ण नियोजन (प्लॅनर) दिले होते. त्याचाही फायदा झाला. विषय समजून घेत सातत्यपूर्ण अभ्यास केल्यामुळे यश मिळाले.

ओम गायधनी. विद्यार्थी, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news