Jayant Patil Nashik | निवडून येण्याच्या भ्रमात राहू नका : जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

म्हणाले, क्षमता असणाऱ्यानाच उमेदवारी दिली जाईल
Jayant Patil Nashik
जयंत पाटीलfile photo

नाशिक : लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. पण निवडून येऊ अशा भ्रमात न राहता निवडणूकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले. निवडणुकीत जिंकण्यासाठी उमेदवारी करायची असल्याचे सांगत निवडून येण्याची क्षमता असणा-यांना उमेदवारी दिली जाईल, असे संकेत त्यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जयशंकर फेस्टीवल लॉन्समध्ये मंगळवारी (दि.२३) शरद पवार गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्याला पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खा. भास्कर भगरे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, शेखर माने, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, दिपीका चव्हाण, नितीन भोसले, उत्तमबाबा भालेराव, दत्तात्रय पाटील, गजनान शेलार, माणिकराव शिंदे, डाॅ. सयाजी गायकवाड आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, नाशिक जिल्हा हा पवार यांना माननारा जिल्हा आहे. त्यांच्या संकटावेळी कायमच जिल्हयाने त्यांना साथ दिली आहे. जिल्हयाने एकदा ठरविले की राज्य त्याचे अनुकरण करते. केंद्र व राज्य शासनाविरोधात मोठी नाराजी होती. राज्यात महाविकास आघाडीला राज्यात मोठा कौल मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीत जागा वाटप निश्चित हाेईल. निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली जाईल. ?त्यामुळे दिलेल्या उमेदवारांमागे उभे राहावे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे. मतदारसंघ पिंजून काढावा, असे पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी यावेळी 'माझ्या स्वप्नातील अभियाना'ची राबविण्याची घोषणा केली. अभियानंतर्गत महाविद्यालयातील तरूणांपर्यंत पोहचून तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे जाणून घेतल्या जातील.

Jayant Patil Nashik
Gokul Jirwal | दिंडोरीत पिता-पुत्र आमने-सामने? गोकुळ झिरवाळ वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार

तर विधानसभा निवडणूक विरोधात लढू : गोकुळ झिरवाळ

शरद पवार गटाच्या निष्ठावान मेळाव्यात नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ यांची हजेरी उपस्थितां मध्ये चर्चेचा विषय ठरला. गोकुळ झिरवाळ यांच्याशी संवाद साधला असता मी आघाडी व शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवार दिसतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय. लोकसभा लढण्यास मी इच्छुक होतो, असे सांगताना कुटुंब वेगळे व राजकारण वेगळे आहे. विधानसभा निवडणूकीत नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात लढण्यासाठी माझी इच्छा आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर मी लढण्यास तयार असल्याचे गोकूळ झिरवाळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news