Ladki Bahin Yojana | जळगाव हादरले! लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी

Ladki Bahin Yojana | सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करत असताना, याच योजनेच्या नावाखाली महिलांची अडवणूक करून त्यांच्या असहायतेचा फायदा घेणारे नराधम समाजात वावरत आहेत.
Friend Abuse Assault
Friend Abuse AssaultPudhari
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करत असताना, याच योजनेच्या नावाखाली महिलांची अडवणूक करून त्यांच्या असहायतेचा फायदा घेणारे नराधम समाजात वावरत आहेत.

Friend Abuse Assault
Ashpak Khan Calangute Death |कळंगुटमधील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू की घातपात? 6 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाने खळबळ

जळगावमध्ये एका नराधमाने योजनेचे केवायसी करून देण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला (३५) या गेंदालाल मिल परिसरात राहतात.

त्यांचे पती गोलाणी मार्केटमध्ये काम करतात. संशयित आरोपी गोकुळ चव्हाण हा पीडितेच्या पतीचा मित्र असल्याने त्याचे घरी येणे-जाणे होते. फिर्यादी महिलेला लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे मिळाले नसल्याने त्यांना केवायसी करायचे होते. पतीचा मित्र असल्याने त्यांनी गोकुळवर विश्वास टाकला. पण याच विश्वासाला त्याने तडा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news