Highway Accident Risk | जळगावात मृत्यूचा 'रॉंग टर्न'! महामार्ग 53 वर नशिराबाद परिसरात नियमांचा अक्षरशः धिंडवडा

Highway Accident Risk | जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 53 वर नशिराबाद-भूसावळ परिसरात वाहतूक नियमांचा अक्षरशः धिंडवडा निघत असल्याचे चित्र समोर येत आहे.
Highway Accident Risk
Highway Accident Risk
Published on
Updated on
Summary
  1. तरसोद ते फागणे आणि तरसोद ते चिखली टप्प्यात रॉंग साईड वाहतूक

  2. सर्विस रोड असूनही चालक नियम तोडत असल्याचे चित्र

  3. डंपर, रिक्षा, मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांचा नियमभंग

  4. वाहतूक शाखा, महामार्ग पोलीस व आरटीओवर निष्क्रियतेचे आरोप

  5. अपघातांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये संताप

जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 53 वर नशिराबाद-भूसावळ परिसरात वाहतूक नियमांचा अक्षरशः धिंडवडा निघत असल्याचे चित्र समोर येत आहे. तरसोद ते फागणे आणि तरसोद ते चिखली या टप्प्यात अनेक वाहने सर्रासपणे ‘रॉंग साईड’ने धावत असल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे सर्विस रोडची सुविधा असूनही अनेक चालक वेळ वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याचे दिसत आहे.

Highway Accident Risk
Shirpur Road Protest Dhule| शिरपूरमध्ये आगळे वेगळे आंदोलन ; रस्त्यावरील खड्ड्यात बसून केली सत्यनारायणाची पूजा

केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून या महामार्गाचे चौपदरीकरण केले आहे. गावांना जोडण्यासाठी अंडरपास, ओव्हरब्रिज तसेच दोन्ही बाजूंना सर्विस रोडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या सुविधा असूनही काही वाहनचालक नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

नशिराबाद परिसरात विशेषतः डंपर, रिक्षा, मोटारसायकल आणि चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात ‘रॉंग साईड’ने ये-जा करताना दिसतात. भुसावळ एमआयडीसीकडे जाणारी अनेक अवजड वाहने देखील सोयीसाठी विरुद्ध दिशेने गाड्या चालवत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे.

एअरपोर्टकडे जाणाऱ्या मार्गावरही अशीच परिस्थिती पाहायला मिळत असून, रोजच्या प्रवासात नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. वाहतुकीच्या या धोकादायक पद्धतीमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता कायम निर्माण होत आहे.

दरम्यान, नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत महामार्गावर अशा प्रकारे अवजड वाहने विरुद्ध दिशेने धावत असताना देखील कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Highway Accident Risk
Ayurveda Doctor Death| प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांची आत्महत्या; पती नीलेश जेजूरकरविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हा वाहतूक शाखा, महामार्ग पोलीस आणि आरटीओ विभाग या तिन्ही यंत्रणा केवळ कागदोपत्री ‘टार्गेट’ पूर्ण करण्यात व्यस्त असून प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

भरदिवसा सुरू असलेल्या या जीवघेण्या प्रकारावर प्रशासन कधी अंकुश आणणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वेळेत कठोर कारवाई न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news