

लासलगाव (नाशिक) : येथील रेल्वे गेट क्रमांक १०५ येथे गुरूवारी (दि.५) आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जनजागृती दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने भुसावळ विभागाच्या सुरक्षा विभाग पथकाकडून संरक्षित रेल्वे क्रॉसिंग वापरण्याचे महत्त्व आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती केली.
यावेळी नागरिकांना लेव्हल क्रॉसिंगवर सुरक्षिततेच्या नियमांचे पालन कसे करावे. ट्रॅक कशी पार करावी. गेट बंद असताना पटर्या ओलांडण्याचे धोके याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी परिवहन निरीक्षक पी. के. सक्सेना, स्टेशन प्रबंधक सुनिल मोरे, सब -इन्स्पेक्टर प्रशांत गवई, अजय कुमार, अभय तोंडसे आदी उपस्थित होते.